Type to search

जळगाव फिचर्स

मोटारसायकल झाडावर आदळली – पती ठार

Share

चोपडा  –

खर्डी (ता.चोपडा) येथे दुचाकीने अंत्ययात्रेला जात असतांना चोपडा-यावल रस्त्यावरील वर्डी फाट्याजवळ मोटरसायकल झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी झाल्याची आज दि.26 रोजी सकाळी 10 वाजता घडली जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागलवाडी (ता.चोपडा) येथील रहिवाशी विकास लोटन पाटील (वय-35) व त्यांची पत्नी अस्मिता पाटील हे आज सकाळी 10 वाजता मोटर सायकलने खर्डी (ता.चोपडा) येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला जात असतांना माचला-वर्डी फाट्या जवळ अचानक तोल गेल्याने मोटर सायकल झाडावर आदळल्याने अपघातात विकास लोटन पाटील जागीच ठार झाले तर अस्मिता पाटील व सुशीला पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघातानंतर जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी जखमींवर प्रथमोपचार करण्यात येऊन शहरातील खाजगी हॉस्पिटलला उपचारासाठी हलविण्यात आले. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरी वरून शहर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील प्राथमिक तपास पो.ना.प्रदीप राजपूत करीत आहेत. अपघातात मयत झालेल्या विकास पाटील यांच्या पश्चात दोन मुले,आई,पत्नी असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!