Type to search

जळगाव

संगीतशिक्षकाने घेतला प्रेमाचा क्लास; विद्यार्थिनीला घेऊन रफूचक्कर

Share

चाळीसगाव । संगीतशिक्षकाने संगीताचे धडे देत असतानाच आपल्या विद्यार्थिनीसोबतच प्रेम सुरू केले अन् शिक्षक व विद्यार्थिनी रफूचकर झाल्याची घटना चाळीसगाव येथे उघडकीस आली आहे. येथील धुळे रोडवरील डेराबर्डी भागातील तरुणी काल दुपारी संगीत क्लासला जाते, असे सांगून घरुन निघाली. मात्र, ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने संगीतचा क्लास घेणारा शिक्षकच तिला घेऊन गेल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. त्यामुळे नातेवाईकांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली; परंतु तरुणी वयात असल्यामुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली असून, आज मिसिंगची तक्रार दाखल करुन घेतली आहे.

याबाबत मुलीच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार चाळीसगाव शहरालगत असलेल्या डेराबर्डी भागातील एक तरुणी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड भागात संगीत शिकण्यासाठी ‘एका’ शिक्षकाकडे येत होती. काल ती नेहमीप्रमाणे दुपारी

क्लाससाठी गेली, मात्र सायंकाळी घरी परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा क्लासच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र ती तेथे नव्हती आणि क्लास घेणारा शिक्षकदेखील तेथून बेपत्ता असल्याचे आढळून आल्यानंतर, तिच्या नातेवाईकांनी क्लासच्या शिक्षकावर संशय घेत शहर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी ती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल करुन घेतली असून तिचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले. सदर तरुणीचा शोध लागल्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार पोलिसांचा पुढील कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.  प्रथम पोलिसांनी सदर तरुणीच्या तसेच क्लासच्या शिक्षकाचा शोध सुरू केला आहे. दरम्यान संगीत शिकवता-शिकवता शिक्षकाने चक्क विद्यार्थिसोबतच प्रेमाचा सूर काढल्यामुळे हा प्रकार घडला असून चाळीसगावात याची एकच चर्चा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!