Type to search

जळगाव

शहिदांच्या कुटुंबीयांना घरपट्टी, पाणीपट्टीत सुटसाठी प्रयत्नशील – खा.उन्मेष पाटील

Share

चाळीसगाव । तालुक्यातील अनेक सैनिकांनी देशसेवा करतांना वीरमरण आले. या शहीद जवानाच्या माता-पिता तसेच शहीद विरपत्नी यांच्या त्यागानेच शहिदांना प्रखर देशसेवा करता आली. त्यांचा त्याग व बलिदान याचा इतिहासाच्या स्मृतींना उजाळा मिळाल्याने नव्या पिढीला त्यातुन प्रेरणा मिळणार आहे. येत्या काळात शहीद कुटुंबीयांना पालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टी यातून सुट मिळेल यासाठी प्रयत्नशील असून उद्याच्या उद्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी बैठक घेऊन त्यावर विचार करावा अशी भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील नेताजी चौकात आमदार उन्मेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधी व नेताजी पालकर चौक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने उभारलेल्या प्रेरणादायी शहीद स्मारकाचे अनावरण सोमवारी खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, सभापती स्मितल बोरसे , उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष के.बी.साळुंखे उपसभापती संजय पाटील, नगरसेवक आनंद खरात, शिवसेना तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, उमंगच्या संपदा पाटील, शिवसेना शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत आदि उपस्थित होते.

सुरुवातीला शहीद जवान माता-पिता व वीर पत्नी यांचा साडी चोळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील यांच्या हस्ते शहीद राजू साळवे, अरुण कुमार जाधव, अमोल साळुंखे, हेमंत जोशी, संतोष पाटील, सोपान आमले, गणेश आहिरराव, अर्जुन पिलोरे, संतोष चौधरी, यांच्यासह तालुक्यातील शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला तसेच देश सेवेत कार्यरत सुनील राजपूत, मदन चव्हाण, मच्छिंद्र तारडे, युवराज पाटील, विठ्ठलराव वाबळे, विजय मराठे, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर शेलार, पुंडलिक बेलदार, वसंत कुमावत, रामदास बेलदार, सुनील राठोड, प्रकाश पाटील, हिराजी देशमुख, सुरेश निकुंभ, मच्छिंद्र तारडे, विलास शेळके, समाधान पाटील, संजय सोनवणे, प्रकाश झाडे, बालचंद्र मगर इत्यादी सेवानिवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक लोटन आबा पाटील, आबासाहेब गरुड , मंगला पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.

संपदा उन्मेष पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी कुठलाच कार्यक्रम घेण्यात आला नाही मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आजच्या वाढदिवसा निमित्त आज शहिद स्मारक अनावरण व शहीद माता पिता व वीर पत्नींचा सत्कार करून त्यांचा देशसेवेविषयी कृतद्यता व्यक्त करण्यात आली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यशस्वितेसाठी शुभम पाटील, बबडी शेख, अक्षय मराठे, रोहन सूर्यवंशी माजी नगरसेवक तुकाराम गवळी, शरद पवार, यश पालवे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, नेताजी पालकर मित्र मंडळ, संत गाडगेबाबा महाराज चौक मित्र मंडळ, नवीन जिन परिसर मित्र मंडळ, गवळीवाडा मित्र मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्तेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक दिनेश बोरसे यांनी केले. तर सूत्रसंचालन सुनील निकम यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!