बेलगंगा विक्रीचा न्यायालयीन मार्ग मोकळा

0
 चाळीसगाव दि. 31। प्रतिनिधी-जिल्हा बॅकेच्या ताब्यातील जवळपास 100 कोटी कर्ज असलेला बेलगंगा साखर कारखाना. जिल्हा बॅकेच्या विक्री प्रक्रियेत भाग घेऊन,  अंबाजी प्रा.लि. कंपनीचे चित्रसेन पाटील यांच्यासह 14 भागीदारांनी मिळुन, 3 कोटी 92 लाख रुपयांचे  नावाने टेंडर  भरुन, सार्वाधिक बोली लावून जवळपास विकत घेतला.
परंतू कामगारांचे थंकित पैसे मिळावे, यासाठी जिल्हा बॅकेच्या विरोधात बेलगंगा एम्लॉईज युनियने न्यायालयात धाव घेतली होती.
त्यामुळे कारखाना विक्रीस न्यायालयाने स्थगिती दिली. परंतू सोमवार दि.31 उच्च न्यायालयाने  जिल्हा बॅक व अंबाजी प्रा.लि.कंपनीच्या बाजूने निकाल देत, कारखाना विक्री बाबतची स्थगिती उठवली असून बेलगंगा विक्री बाबतचा न्यायालयीन मार्ग मोकळा केला आहे.

परंतू न्यायालयाने कर्मचार पीएफचे थकीत 11 कोटी रुपये जमा करण्याचे देखील आदेश देखील दिले आहेत. आता कारखाना जर अंबाजी कंपनीला ताब्यात मिळाला तर येत्या गळीत हंगामात कारखाना सुरु करण्याचा विश्वास मा.चे.चित्रसेन पाटील यांनी देशदूत शी बोलतांना दाखविला आहे.

जिल्हा बॅकने बेलगंगा विक्रीसाठी एमएसटीसी कंपनीच्या मार्फत ऑनलाईन प्रक्रिया पार पाडली. यात अंबाजी प्रा.लि.कंपनी 3 कोटी 92 लाख रुपयांचे टेंडर भरुण कारखाना विक्री प्रकियेत सहभाग घेतला होतो.

अंबाजी प्रा.लि.कंपनीची सर्वांत जास्त बोली असल्यामुळे, जिल्हा बॅकेनेही ठराव करुन, कारखाना अंबाजी प्रा.लि.कंपनिला विक्री करण्यांचा निर्णय घेतला होता.

परंतू कर्मचार्‍यांचे पीएफचे पैसे व 110 महिन्यांचे थकीत रक्कम मिळावी, यासाठी बेलगंगा सह.साखर कारखाना एम्लॉईज युनियने कारखाना विक्री विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

त्यामुळे न्यायालयाने जिल्हा बॅकेला कारखाना विक्री संदर्भात स्थगितीचे आदेश दिले होते. सोमवार दि.31 रोजी या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, मा.न्यायालयाने कारखाना कर्मचारी युनियन, जिल्हा बॅक व अंबाजी प्रा.लि.कंपनीची बाजू ऐकूण घेतली.

यावेळी बॅकेच्या बाजूने अ‍ॅड.व्ही.डी.सांळुखे तर अंबाजी प्रा.लि.च्या बाजूने अ‍ॅड.धनजंय ठोके यांनी भक्कम बाजू मांडली, त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी कारखाना विक्रीबाबत लावलेली स्थगिती न्यायालयाने उठविली आहे.

मात्र कर्मचार्‍यांचे पीएफचे जवळपास 11 कोटी रुपये जमा करण्याचेही आदेश दिले असून ते जमा केल्या शिवाय कारखाना विक्री करता येणार नाही आहे. कर्मचार्‍यांचे बाजूने अ‍ॅड.एस.एस. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

आता कारखाना सुरु होण्याबाबतच्या आशा अधिक पल्लवीत झाल्यामुळे, शेतकर्‍यांमध्ये आनंदाची वातावरण निर्मीती झाली आहे.प्रतिक्रिया- यंदाच्या गळीत हंगामात कारखाना सुरु करण्यांचा प्रयत्न- कारखाना सुरु होण्यांसबंधीत आता न्यायालयीन अडथळा दुर झाला आहे.

न्यायालयाने भूमिपूत्र्यांच्या मालकीचा होऊ पाहणार्‍या कारखान्याच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे हा जगन्नाथाचा रथ सर्वांच्या सहकार्य पुढे हाकण्याची आमची जबादारी आहे.

कारखाना ताब्यात मिळाल्यावर दोन ते तीन महिने त्याच्या दुरुस्तीसाठी लागणार आहेत. त्यानतंर लगेच तो सुरु करण्याचा म्हणेज गळीत हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये तो चालू करण्याचा प्रयत्न आहे.

 चित्रसेन पाटील,माजी.चेअरमन बेलगंगा साखर कारखान प्रतिक्रिया- न्यायालयाने बेलगंगा कारखाना विक्रीबाबतची स्थगिती उठवलेली आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेत हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आता उर्वरित रक्कम भरल्यानतंर अंबाजी प्रा.लि.कपनीच्या ताब्यात कारखाना मिळणार आहे.

 अ‍ॅड.धनजंय ठोके -पहिली लढाई जिंकली  न्यायालयाने कारखाना विक्रीबाबतची स्थगिती उठवलेली आहे. परंतू कर्मचार्‍यांचे पीएफचे 11 कोटी रुपये देण्यांचेही आदेश दिले आहे.

ते जमा केल्याशिवाय कारखान्याचे सिल काढता येणार नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी पहिली लढाई जिंकली आहे. पुढे आमचे थकित वेतन मिळेपर्यंत न्यायालयात केस चालूच राहणार आहे. बापुराव पाटीलअध्यक्ष-कर्मचारी युनियन

LEAVE A REPLY

*