Type to search

जळगाव राजकीय

चाळीसगावात पहिल्या दोन तासात स्पष्ट होणार निकालाचे चित्र !

Share

चाळीसगाव । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.24 रोजी मतमोजणी होणार असून पहिल्या दोन तासातच निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी साधारणता; 24 फेर्‍या होणार असून दुपारी 12 वाजपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे. प्रशानातर्फे मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 150 हून अधिक अधिकार-कर्मचार्‍यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातील य.ना. महाविद्यालय येथे मतमोजणीस संकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे. मतमोजणी कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल ठेवण्यात आले आहेत. एका टेबल साठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातील. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाईल. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जाणार आहे. मतमोजणीच्या साधारणता; 24 फेर्‍या होणार आहेत. सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्राँग रूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले करणार आहे. तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पहिले दोन तास निर्णायक-
मतमोजणी सुरुवात झाल्यानतंर सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार आहे. त्यानतंर अर्धा तासात ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणी सुरुवात झाल्यानतंर पहिल्या दोन तासाता निकालाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!