Type to search

जळगाव

चाळीसगाव आगारातील निम्म्या बसेस भंगाराच्या वाटेवर

Share

चाळीसगाव । मनोहर कांडेकर

चाळीसगाव आगार हे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. तालुक्याह राज्य व पराज्यात जाण्यासाठी नेहमीच प्रवाशांची येथे गर्दी असते. येथील आगारातून नियमित 82 बसेस प्रवशांच्या सेवेसाठी सोडल्या जातात. परंतू, त्यापैकी जवळपास निम्म्या बसेस अतीशय खराब झाल्या असून स्कॅ्रपच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. स्क्रॅपच्या मार्गावरील बसेसच्या दुरुस्तीसाठी महिन्याला जवळपास 10 लाख रुपय खर्च येत असल्याने आगारात आर्थिक फटका बसत आहे. आगारातील चालक तारेवरची कसरत करुन या बस चालवत असल्यामुळे त्यांच्यासह प्रवशांना कंबर व मानेचा त्रास बळावत आहे.

औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आदी चार जिल्ह्याच्या सीमेवर चाळीसगाव आहे. येथील बसआगार हे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. चाळीसगाव आगारातून दररोज 30 ते 35 हजार प्रवाशी प्रवास करतात. त्यापैकी फक्त विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे. येथील आगारातून दररोज 82 बसेस सोडल्यात जातात. त्यात लांब, मध्यम लांब, लोकल, शटल बसेस, तर सुरत व सिलवासा दोन परराज्यातदेखील येथून बसेस जातात. यात सोलापूर, पुणे, पंढरपूर या लांब पल्ल्याच्या गाड्या जातात, तर पाठोपाठ बुलढाणा, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, मालेगाव, चोपडा, पारोळा, जळगाव, आदी ठिकाणी बसेस जातात.

तसेच तालुक्यातील सर्व गांवामध्ये बसेस जातात. ग्रामीण भागात सोडण्यात येणार्‍या बसेसची संख्या जवळपास 40 ते 45 आहे. 82 बसेसमुळे चाळीसगाव आगाराला महिन्याचे 2 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळते. तर सण, उत्सव, लग्नसराई व सुट्टीच्या कालावधीत यात नेहमीच भर पडत असते. परंतू, उत्पन्नाच्या मानाने आगारातून पाहिजे त्याप्रमाणात प्रवाशांना सेवा दिली जात नाही. यांचे मुख्य कारण म्हणजे आगारातील निम्म्या बसेस या जवळपास पूर्णत: खराब झाल्या असून त्या स्क्रॅपवर जाण्याच्या मार्गावर आहे.

यातील बर्‍यास बसेसला 10 ते 12 वर्षांच्यावर कालावधी झाल्याने त्यांचे आर्युमान आगाराच्या दृष्टीने संपले आहे. तरीदेखील नवीन बसेस मिळत नाही. म्हणून त्याच बसेस बळजबरीने दुरुस्ती करुन रोडावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. भाडे देवूनही चांगली सुविधा मिळत नसल्यामुळे तो खासगी वाहनाने प्रवास करण्याच्या मार्गाने जाण्याचा विचार करतो. बसेस खटारा झाल्यामुळे चालकासह प्रवाशांना मान व कंबरदुखी त्रास होऊ लागला आहे. यासंबंधीत चालकांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करुनही काही एक उपयोग झालेला नाही. चाळीसगाव आगाराल त्वरित नवीन बसेस मिळल्या नाहीतर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

बसेसचे आयुष्यमान सपंले

चाळीसगाव आगारातूत सुटणार्‍या 82 बसेसपैकी निम्म्या बसेस हजारो किलोमीटर फिरल्याने त्याचे आयुष्यमान संपल्यात जमा आहे. त्यामुळे स्क्रॅप करण्याचा मार्गावर आहे. परंतू, नवीन बसेस येत नसल्यामुळे, पर्याय नसल्यामुळे चालक व प्रवशांचा जीव धोक्यात टाकून, त्याच बसेसला तात्पूर्ती दुरुस्ती करुन आगारतर्फे चालविण्यात येत आहे. अनेक बसेसच्या बॅटरी व इतर वस्तू या रोडावर चालताना मध्येच बंद पडून जातात. तर बसमध्ये बसलेल्या प्रवशांच्या हातावरदेखील खिडक्या पडतात. काही बसेस रस्त्यातच बंद पडत असल्यामुळे प्रवशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

महिन्याला 10 लाख रिपेरिंगवर खर्च

स्क्रॅपच्या मार्गावर जाणार्‍या बसेसमध्ये ग्रामीण भागात चालणार्‍या लोकल बसेसचा अधिक आहेत. येथील वर्कशॉपमध्ये दररोज चार ते पाच बसेसच्या दुरुस्तीसाठी येतात. स्क्रॅपच्या मार्गावरील बसेसच्या दुरुस्तीसाठी महिन्याला चक्का 10 लाख रुपयांच्यावर खर्च येत असल्याची माहिती हाती आली आहे. यात टायर, ट्यूब 5 लाख, बॅटीर व इतर वस्तू 3 ते 4 लाख, ऑईल 90 हजार इतका खर्च महिन्याला येतो. त्यामुळे आगारात 10 लाखांचा आर्थिक फटका बसतो आहे. वर्कशॉपमधील मेकॅनिकदेखील त्याच-त्या बसेस दुरुस्त करुन वैतागले आहेत. तसेच पुन्हा-पुन्हा त्याच बसेस दुरुस्त करण्यात येत असल्यामुळे इतर बसेसच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्टदेखील शिल्लक राहत नसल्याने इतर बसेस चार ते पाच दिवस स्पेअर पार्टअभावी वर्कशॉपमध्येच उभा राहत असल्याची माहित समोर आली आहे. त्यामुळे येथील बसेसचे वाहतूक वेळापत्रक वारंवार खराब होते. त्यामुळे येथील आधिकारीदेखील प्रवशांच्या प्रश्नाना उत्तरे देवून वैतागले असून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास होऊ लागला आहे. यासंबंधी जिल्हा व विभागीयस्तरावर रिर्पाटिंग करुनदेखील कुठल्याच प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत हे विशेष म्हणता येईल!

मोठी दुर्घटना होण्याची शक्यता?

चाळीसगाव अगारातून सुटणार्‍या बसेसचा किरकोळ व मोठा अपघात झाल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. तर मागील महिन्यात 2 अपघात होऊन प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात स्क्रॅपच्या मार्गावर असलेल्या बसेसमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे वेळीच दक्षतेची पाऊल उचलून आगारप्रमुखांनी नवीन बसेस मिळविण्यासाठी जोर लावण्याची मागणी होऊ लागली आहे.

चार वर्षांपासून एकही नवीन बस नाही!

चाळीसगाव आगाराला पूर्वी वर्षाला दोन ते तीन नवीन बसेस मिळायच्या. परंतू, गेल्या तीन ते चार वर्षांपासून आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही. यामागाचे कारण शासनाकडूनच नवीन बस खरेदी करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. चाळीसगाव आगारात आजच्या घडीला 10 ते 15 नवीन गाड्यांची अत्यंत आवश्यकता असून त्या मिळविण्यासाठी पाठपुरवा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रस्त्यांमुळे बसेसची लागली वाट

तालुक्यातील सायगव्हाण, कुंझर, दस्केबर्डी, जुनपाणी, गंगाश्रम, डोणपिंप्री, शिदवाडी, लैजे, घोडगाव, चाळीसगाव-धुळे महामार्ग या रस्त्यांची अवस्था गेल्या काही वर्षांपासून अतीशय वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडल्यामुळे बसेसचे नेहमीच नुकसान होत. खड्ड्यात बस गेल्याने टायर, स्प्रिंग, बॉडी खराब होते. रस्ते दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुराव करुनदेखील काहीएक उपयोग नाही. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेच बसेसची वाट लागत असल्याचे चालकांमधून प्रतिक्रिया आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!