Type to search

Breaking News जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

चाळीसगावचे संस्थाचालक, शिक्षकाची मंत्रालयावरुन उडी

Share

मुंबई/चाळीसगाव । विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यासाठी काही तासच उरले असताना मंत्रालयात दोन व्यक्तींनी उड्या मारल्याने काही काळ मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना घडताच पोलिसांची या व्यक्तींना वाचवण्यासाठी तारांबळ उडाली. मंत्रालयात जाळी लावली असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चाळीसगाव येथील हेमंत पाटील आणि मराठवाड्यातील शिक्षक अरुण नेतोरे अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. यातील हेमंत पाटील हे संस्थाचालक असल्याचे समजते. त्याच्यासह सुमारे 20 व्यक्तींना पोलिसांनी या घटनेनंतर ताब्यात घेतले. हा 300 विनाअनुदानित शाळांना मान्यता देण्याचा मुद्दा होता. त्यासाठी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मंत्रालयात भेटीसाठी आले होते. गेले 3 दिवस हे शिक्षक मंत्रालयात येत होते.

नागपूर, सांगली, कोल्हापूर या वशिल्याच्या दिव्यांग आश्रमशाळांना अनुदान मंजूर करण्यात आले. मात्र गेली 15 वर्षे आम्ही सातत्याने पाठपुरावा करून हि आमच्या शाळांना अनुदान मिळत नाही ह्याच्या निषेधार्थ मंत्रालयात जळगावच्या हेमंत पाटील याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्या वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र मंत्रालयात लावलेल्या जाळ्यांमुळे त्याचा प्रयत्न फसला आणि पोलिसांनी हेमंत पाटील , अरुण नेटोरे याना अटक केले.

गेली 15 वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही आमच्या शाळांचे कायम अनुदानित हा शब्द वगळत नसल्यामुळे आम्हाला अनुदान मिळत नाही. मंगळवारी मंत्रालयात सामाजिक न्याय खात्याचे मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे ह्यासंदर्भात बैठक झाली . मात्र 3 शाळा वगळता इतर दिव्यांग आश्रम शाळांना अनुदान मंजूर झाले नाही . विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते .त्यामुळे आमच्या शाळांना अनुदान मंजूर होणार नाही , इतकी वर्षे काम करून अनुदाना अभावी संस्था चालक पगार देत नाही .त्यामुळे आम्ही करायचे काय असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला.

दरम्यान 1300पेक्षा जास्त शिक्षकांचे पगार आणि थकबाकी मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देण्याचे आदेश 2016ला दिले होते . 2012ला केंद्र आणि राज्यशासनाने ही योजना सुरू केली होती . आणि 2015ला आमचे पगार रोखण्यात आले . त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो होतो . आश्रम शाळांमधील पटसंख्या बोगस असल्याचे मंत्रालयात अधिकारी सांगतात . केंद्रशासनाकडून अनुदानापोटी 100कोटी पेक्षा जास्त निधी राज्यसरकारला मिळाले मात्र राज्यसरकरकडून आमच्या आश्रम शाळांना अनुदान दिले जात नाही असा आरोप आंदोलनकर्ते करत होते.
हेमंत पाटील (रा.पाटणादेवी रोड, चाळीसगाव) हे सन 2007 पासून शहरातील धुळेरोड येथे मतिमंद शाळा विनाअनुदानित तत्वावर चालवत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!