Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

चाळीसगावात मुलाने केला आईचा खून

Share

चाळीसगाव । चाळीसगावातील 55 वर्षीय महिलेचा चारित्र्याच्या संशयावरुन पोटाच्या मुलानेच खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. पमाबाई वाल्मीक शेवाळे (55) असे मयत महिलेचे नाव असून पोलिसांनी संशयित आरोपी मुलास ताब्यात घेतले आहेे.

शहरातील शिंगटे मळ्यात वाल्मीक शेवाळे, त्याची पत्नी पमाबाई शेवाळे व मुलगा समाधान ऊर्फ आबा शेवाळे(22) राहतात. ते मोलमजुरी करत होते. दोन महिन्यांपूर्वीच पंडित शिंगटे यांच्या घरात ते भाडेकरु म्हणून राहण्यास आले होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान घरमालकीन बाई भाजीसाठी कडीपत्ता घेण्यासाठी आल्या असताना, त्यांनी भाडेकरु मयत पमाबाई शेवाळे यांना आवाज दिला. परंतु घरातून काही एक प्रतिसाद न आल्यामुळे, त्यांनी दरवाजाचा उघडून पाहिला असता, पमाबाई ह्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या होत्या. त्यांनी लागीच आजुबाजूच्याना घडलेली घटना सांगितली. समोरच राहणारे सेवानिवृत्त डिवायएसपी श्री.राठोड यांनी लगेच चाळीसगाव पोलीस स्टेशनाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विजय ठाकुरवाड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत पमाबाई यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करण्यात आले असून घटनास्थळी कुर्‍हाड मिळून आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस आधिकारी उत्तम कडलग, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रताप शिकारे यांनी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करुन, मयत पमाबाई यांचे प्रेत श्वविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालायत पाठविले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला सुरुवातील आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू रात्री उशिरा संशियीत आरोपी समाधान ऊर्फ आबा शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

असा झाला खून- 
मयत पमाबाई यांचे पती वाल्मीक शेवाळे हे गेल्या दोन दिवसांपासून येवला येथे त्यांच्या दोन नातींना सोडण्यासाठी मुलीकडे गेले होते. तर पमाबाई व मुलगा समाधान हे दोन्ही घरात होते. पमाबाई यांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे संशय गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा समाधान यास होता. यावरुनच आई-मुलामध्ये दररोज भांडण होत असे, मंगळवारी समाधान शहरापासून जवळच असलेल्या कजगाव येथे सेनट्रींक कामासाठी गेला होता. त्यानंतर घरी दारू पिऊन आला. त्यावेळी आई व त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर समाधन याने आई पमाबाई यांच्या डोक्यात कुर्‍हाडी वार केले. यात पमाबाईचा यांचा जागीच मृत्यू झाला. समाधान मध्यरात्रीच मयत आईला सोडून बहिणीकडे येवला येथे पसार झाला.

पोलिसांनी काही तासातच केला खूनाचा उलगडा-
घटनेची माहिती मिळाताच उपविभागीय पोलीस आधिकारी उत्तम कडलग व पो.निरिक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. व परिस्थिती जन्य पुराव्या आधारावर आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्यात. त्यानुसार पमाबाईचा यांचा खून त्यांच्या मुलानेच केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी यावले येथे तात्काळ पोलीस पथकास पाठवून संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी काही तासाच खूनाचा यशस्वी तपास केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!