Type to search

maharashtra जळगाव

चोरट्यांच्या कारने महिलेला चिरडले

Share
चाळीसगाव । चाळीसगाव-भडगावरोडवर खरजई नाक्याजवळ चोरीच्या शेळ्यांची वाहतूक करणार्‍या कारने दुचाकीला समोरुन जबर धडक दिली. या अपघात एक महिला जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक जखमी झाला आहे. कारमधील शेळ्यांची सुटका करुन कारचालकास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर घटनास्थळी उपस्थित जमावाने कारच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना दि.15 रोजी दुपारी 12 वाजेेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बेबीबाई ऊर्फ अंजनाबाई पंढरीनाथ चौधरी (65, रा.खरजई नाका) असे मयत महिलेचे नाव आहे. या घराजवळूनच दुचाकी क्र.एमएच 19 एजी 6529ने कामानिमित्ताने मुलगा सुनील चौधरी यांच्यासोबत दुचाकीवर बसून तब्येत दाखविण्यासाठी पूर्णपात्रे हॉस्पिटल येथे जाण्यासाठी घराजवळून निघाल्या असताना, समोरुन भरधाव नेणार्‍या कार (क्र.एमएच 15 एजे 0689) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती, बेबीबाई या कारच्या पुढच्या भागात अडकल्याने कारने त्यांना दूर अंतरापर्यंत फरफटत नेले. तर सुनील चौधरीदेखील बाजुला फेकले गेले. बेबीबाई यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत, कारची पाहणी केली असता, त्यात चाळीसगाव परिसरातून सकाळी चोरी केलेल्या आठ शेळ्या कोबून ठेवलेल्या होत्या. जमावाने कारमधील तिघांना काचा फोडुन बाहेर काढले. यात दोघे जण संधीचा फायदा घेवून पसार झाले. तर एका पडून नागरिकांनी चोप दिला असता, त्याने बकर्‍या चोरीची कबुली दिली. नतंर नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देवून, कारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर आठ शेळ्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मुकेश मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन सलीम करीमखान पठाण (रा.मखमलाबाद, पंचवटी- नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान गेल्या महिनाभरापासून रोडाचेे काम चालू असल्यामुळे याठिकाणी वाहनाची प्रचंड गर्दी होते. तसेच वाळूचेे वाहनदेखील खरजई नाक्याजवळ दररोज उभे राहत असल्यामुळे रहदारीला मोठा आडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

वेगवेगळ्या नंबर प्लेट वापरुन शेळ्या चोरीची शक्कल
अपघातात जमा करण्यात आलेल्या कारमध्ये निर्दयीपणे आठ शेळ्या कोंबून भरलेल्या होत्या. तसेच शेळींना आकर्षित करण्यासाठी मका देखील होता. शेळीची चोरी करुन, वाहन पळविण्यासाठी वेगवेगळ्या तीन नंबर प्लेट कारमध्ये आढळून आल्यात. त्यामुळे शेळी चोरीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!