Type to search

जळगाव फिचर्स

ट्रकची मोटारसायकलला धडक; भावाचा मृत्यू, बहीण जखमी

Share

चाळीसगाव 

तालुक्यातील चाळीसगाव-बहाळ रस्त्यावर ऋषिपांथा येथे समोरून येणार्‍या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने पाचवर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर बहीण व वडील किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दि.13 रोजी घडली. ब्रिदेश रेवसिंग पावरा (वय 5, रा.दुसखेडा, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेवसिंग शीलसिंग पावरा व अशोक चिका पावरा (दोघे रा.दुसखेडा, ता.पाचोरा) हे तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलांना घेण्यासाठी दि.13 रोजी गेले होते.

रेवसिंग पावरा हे आपल्या मोटारसायकलवर (क्र.एमएच-39/एए-8893) दोघा मुलांना घेऊन चाळीसगाव-बहाळ रस्त्याने जात असताना बहाळ गावाजवळ ऋषिपांथा येथे समोरून येणार्‍या ट्रकने (क्र.एमएच-41/जी-6834) रेवसिंग पावरा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात मोटारसायकलवर बसलेला ब्रिदेश, सरस्वती व रेवसिंग हे तिघे दूरवर फेकले केले. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने ब्रिदेशचा जागीच मृत्यू झाला, तर सरस्वती व रेवसिंग यांना किरकोळ मार लागला आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये अशोक चिका पावरा यांच्या खबरीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक निरापराध नागरिकांना प्राण गमवावे लागले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!