डिप्लोमाचे प्रवेश आता सीईटीऐवजी ‘डीटीई’मार्फेत

0
जळगाव । राज्यातील पदविका अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा) प्रवेश आता महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (राज्य सीईटी सेल) यांच्याऐवजी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) होतील. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे आता डिप्लोमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य राहणार नाही. गेल्यावर्षी सर्व डिप्लोमाचे प्रवेश सीईटीच्या प्रक्रियेमार्फत देण्यात आले होते. त्यावेळी जात पडताळणीवरून गोंधळ उडाला होता.

राज्य सरकारने डिप्लोमा कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी डीटीईला सक्षम प्राधिकारी जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून डीटीईमार्फतच सर्व डिप्लोमा कोर्सेसना प्रवेश दिला जाईल. डीटीईफद्वारे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. या प्रवेशप्रक्रियेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार तंत्रशिक्षण संचालकांना राहणार आहेत. त्यासाठी डीटीईतर्फे ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित केली जाणार आहे. गेल्यावर्षीच्या प्रवेशप्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करताना सीईटीने विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य केले होते. डिप्लोमाला फक्त जातीच्या दाखल्यावर प्रवेशप्रक्रिया होत असते; जात पडताळणी प्रमाणपत्र घेतले जात नाही. तरीही त्या सक्तीमुळे काही विद्यार्थयांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी डीटीईवर सोपविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*