Type to search

Breaking News जळगाव

जळगाव : ऑन ड्युटी सहा.फौजदाराचा मृत्यू : रात्रीच पोलीस ठाण्यात झाला होता वाढदिवस साजरा

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

जळगाव शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार सुरेश रघुनाथ पाटील (वय ५७) याना ड्युवटीवर असताना रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यांना तत्काळ ऑर्किड हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला.

कालच पो.स्टे.ला साजरा झाला वाढदिवस
सहा.फौ.सुरेश पाटील यांचा काल वाढदिवस असल्याने ते रात्री ८ वा. ड्युटीवर आले असता पोलीस ठाण्याचे पी.आय.अरूण निकम व सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस आनंदात साजरा केला. त्यांची रात्री ८ ते सकाळी ८ अशी ड्युटी होती. मात्र मध्यरात्री नंतर त्यांची अचानक तब्बेत बिघडली. कोणताही विलंब न करता त्यांना तत्काळ ऑर्किडला दाखल केले होते.

हिराशिवा कॉलनीत राहणारे सुरेश पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!