Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

11 पतसंस्थाच्या तपासणीची कागदपत्रे ‘ईडी’पर्यंत पोहचलीच नाहीत

Share
पंकज पाचपोळ
जळगाव । जिल्ह्यातील घोटाळेबाज पतसंस्थाच्या तपासणीचे कागदपत्रे ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालयाने) विशेष लेखा परिक्षकांकडे मागितले आहेत. तपासणी व कागदपत्रांच्या जमवा-जमवीसाठी स्वतंत्र पथके देखील जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप एकही पतसंस्थेची कागदपत्रे ‘ईडी’पर्यंत पोहचलेलीच नाहीत.

जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थामधील आर्थिक व्यवहारात मनी लाँडरिंग सायकल ऑफ फंन्डस गैरव्यवहार, अफरातफर गैरविनीयोजन अशा प्रकारात दोषी आढळणार्‍या संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी, कर्जदार यांची गोपनीयरित्या तपासनी करुन तसा अहवाल विशेष लेखा परिक्षकांमार्फत ‘ईडी’(अंमलबजावणी संचालनालया)कडे पाठविण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

यासाठी विशेष लेखा परिक्षकांनी तालुका सहाय्यक निबंधकांच्या नेतृत्वाखाली 11 विशेष पथकांची नियुक्ती केली होती. तर चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेची स्वत: विशेष लेखापरिक्षक चौकशी करीत होते. दरम्यान या 11 पथकांनी अद्याप चौकशीचा कोणताही अहवाल विशेष लेखा परिक्षकांकडे दिलेला नाही.

जिल्ह्यातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था विठ्ठल रुख्माई अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी भुसावळ, तापी सहकारी पतपेढी सावदा, काळा हनुमान अर्बन को.ऑफ सोसायटी भुसावळ, सावदा-फैजपूर नागरी सहकारी पतसंस्था, गुरुदेव मर्चंड को.ऑफ क्रे.सोसायटी फैजपूर, सत्पश्रृंगी अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी भुसावल, अवसायनात निघालेली फैजपूर मर्चंट को.ऑप क्रेडीट सोसायटी, सावदा मर्चंट को.ऑप क्रेडीट सोसायटी, स्वामी समर्थ अर्बन सोसायटी भुसावल, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यावल, चंद्रकांत हरी बढे पतसंस्था वरणगाव या पतसंस्थाचा यात सहभाग आहे.

बढे पतसंस्थेचा अहवाल आठ दिवसात!
वरणगाव येथील चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेची तपासणी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 8 दिवसात या पतसंस्थेचा तपासनी अहवाल ‘ईडी’ अंमलबजावणी संचलनालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विशेष लेखा परिक्षक रावसाहेब जंगले यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!