Type to search

जळगाव

…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी

Share

जयेश शिरसाळे
जळगाव । बाप से बेटा सवाई ही म्हण तंतोतय खरी ठरविली आहे, ती जळगावचे प्रितम यावलकर यांनी. पोलीस दलातून सहाय्यक फौजदार म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झालेले विकास यावलकर यांचा मुलगा प्रितम हा अक्कलकोट येथे डिवायएसपी म्हणून कार्यरत आहे. मुलगा डिवायएसपी झाल्याने सहाय्यक फौजदार असलेले विकास यावलकर यांनी त्याला सलामी ठोकून खर्‍या अर्थाने पित्याचे कर्तव्य निभाविले आहे.

जळगावातील विकास यावलकर हे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस दलात कार्यरत होते. पोलीस दलाची नोकरी म्हणजे दररोजची दगदग, 24 तास ड्युटी, कुटुंबापासून नेहमी दूर राहवावे लागते. ही सर्व परिस्थिती माहित असतांना आपल्या मुलांना पोलीस दलातील उच्च आधिकारी व्हावे अशी विकास यावलकर यांची इच्छा होती. त्याचा मुलगा प्रितम याची सन 2011 मध्ये डिवायएसपी म्हणून नियुक्ती झाली असून तो सध्या अक्कलकोट येथे कार्यरत आहे.

वडील पोलीस असल्याने सुरुवातीपासून कुटुंबामध्ये शिस्तीचे वातावरण होते. महाविद्यालयीन शिक्षण लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय येथे झाल्यानंतर महाविद्यालय शिक्षण मू.जे महाविद्यालयात घेतले. त्यानंतर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला नव्हता. वडीलांनी तुला काय करायचे ते तुच ठरवं असे सांगितल्याने, इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. परंतू पहिल्याच वर्षी इंजिनिअरींग सोडून वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. यावेळी वडीलांनी मला इंजिनिअरींग का सोडले याबाबत विचारणा केली नाही. त्यांचे मला नेहमी पाठबळ राहायचे.वाणिज्य शाखेचे शिक्षण सुरु असतांनाच आयएमआर कॉलेजला दीड वर्ष नोकरी केली.

याच बरोबर स्पर्धा परिक्षेचा देखील अभ्यास सुरु ठेवला. पाहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो. वयावेळी बाबांनी टेन्शन घेवून नको, प्रयत्न सुरु ठेव असे सांगितले. वडीलांसह पोलीस खात्यातील अधिकार्‍याची जिज्ञासा, तसेच वडीलांच्या अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन घेवून दुसर्‍या प्रयत्नात स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालो अन् डिवायएसपी झालो. सुरुवातीला परभणी, कन्नड व आता अक्कलकोट येथे डिवायएसपी म्हणून कार्यरत आहे. हे सर्व फक्त माझ्या वडीलांमुळे शक्य झाले. वडीलांनी वेळोवेळी माझ्या पंखांना बळ दिले अन् मी अधिकारी झालो. त्यामुळे माझ्या मार्गदर्शक वडीलांना शतायुषी आयुष्य लाभो हीच माझी प्रभु चरणी इच्छा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!