Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगावात उभी राहतेय ‘औषध मुक्त जीवना’ची चळवळ

Share
चेतन चौधरी
जळगाव । सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकविध आजार बळावतात, मनुष्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. प्रत्येक जण औषधींचा आधार घेऊन जीवन जगत आहे. त्यामुळे हि स्थिती निवारणासाठी डॉ. प्रविण चोरडीया यांनी ‘औषध मुक्त जीवन’ हि संकल्पना रुजविण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमास व्यापक स्वरुप प्राप्त होत आहे. कार्यशाळेतून नैसर्गिक जीवनशैली, शुध्द आणि सकस आहार, योग साधना, घरगुती उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. यातून निरोगी जीवन जगण्याची कला आचरणात आणण्यासाठी चळवळ उभी राहत आहे.

सध्याची जीवनशैली गतिमान आणि तणावपुर्ण झाली आहे. आहारात फास्ट फुड, कोल्डड्रिंक आदींचे सेवन वाढले आहे. रसायनांद्वारे पिकविलेला भाजीपाला, प्रदुषणात होत असलेली वाढ आणि लहान-सहान आजारांसाठी औषधींचा होत असलेला वापर, यामुळे नवनविन आजार उद्भवत आहेत. ह्रदयरोग, कर्करोग, रक्तदाब, मधुमेह हे आजार तर सवसामान्य झाले आहेत. या भीषण परिस्थितीवर मात करण्याByसाठी डॉ. प्रविण चोरडीया यांनी ‘औषध मुक्त जीवन’ हि संकल्पना राबविण्यात सुरुवात केली असून याबाबत शहरात कार्यशाळा घेतल्या जात आहे. यातून आपल्या दैनंदिन आहारात रसायनमुक्त सेंद्रीय भाजीपाला आणि फळांचे सेवन केले पाहिजे. शरीरास भरपूर प्राथिने मिळण्यासाठी सकस आहार, फळांचे सेवन करावे. गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी, मक्याचा वापर करावा. रात्रीच्या वेळेस नाचली, भगर पासून बनविलेल्या पोळ्या खाणे केव्हाही चांगले. मोड आलेले कडधान्य सेवन करणे कसे फायदेशीर आहे, याबाबत डॉ. चोरडीया यांनी मार्गदर्शन केले. मीठ, साखर आणि रिफाइंड तेल हे विषाप्रमाणे असून याऐवजी सैंधव मीठ, गुळ आणि कच्चे घाणीचे तेल वापरण्याचा सल्ला डॉ. चोरडिया यांनी शिबीरातून दिला.

उपवासातून उर्जा वाढवा
आपण दररोज अन्न ग्रहण करतो. मात्र शरीराच्या अंतर्गत शुध्दीसाठी उपवासाला महत्व आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो, मेंदू अधिक कार्यक्षम होतो. तसेच रात्रीचे जेवण आणि सकाळचा नास्ता यात 14 तासांचे अंतर असावे.

निसर्गातून आजारावर उपचार
सकाळच्या शुध्द हवेत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दररोज मोकळ्या ठिकाणी फिरायला जाणे. व्यायाम, योगासन, धावणे तसेच डोळ्यांसाठी सुर्यदर्शन करावे. सूर्यप्रकाशात बसावे, शरीराला तेलाने मालिश करावी. आरओचे अतिशुध्द पाणी शरीरासाठी उपयुक्त नाही. त्यामुळे उकळलेले पाणी प्यावे. झोप हि शरीरासाठी उर्जादायी असल्याने महत्वपूर्ण आहे त्यामुळे पुर्ण झोप घ्यावी. यापध्दतीचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत दाखविले जाते.

सर्दी, खोकला, ताप फायद्याचे
शरीर गरम असणे आपल्यासाठी फायद्याचे आहे. अशा वेळी आपल्या शरीरातील जीवाणू बाहेरुन आलेल्या जीवाणूंशी लढा देत असतात. ताप आल्यास शरीर आणि पोटाला आराम देणे गरजेचे आहे. आराम केल्यास सर्दी, खोकला आणि ताप लवकर बरा होतो. अशा वेळी आपण अ‍ॅन्टीबायोटीक औषधी घेतल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तसेच दुष्परिणाम देखील उद्भवत आहेत. त्यामुळे आपण आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय करण्याचा सल्ला डॉ. चोरडीया यांनी दिला. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शिवांबू उपचार पध्दतीवर देखील कार्यशाळेतून मार्गदर्शन केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!