Type to search

जळगाव

धावण्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरपासून महिलांची होऊ शकते मुक्ती!

Share

मधुरा धोटे
जळगाव । महिला विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. व्यावसाय किंवा नोकरी करुन मुलांचा सांभाळ करीत असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, चाळीशी पार केल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरसह अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणून महिला जे.आर. जळगाव रन ग्रुपच्या 50 महिलांनी पुढाकार घेऊन ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारापासून मुक्तीसाठी महिलांना शारीरिक आरोग्यासह शरीर फिटनेससाठी उपायांवर भर देत आहे. अशी माहिती प्रेमलता सिंग यांनी आज रविवार दि. 20 रोजी होत असलेल्या पिकेयॉन रनच्या पार्श्वभूमिवर ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

पूर्वी पिकेथान जे.आर.जी जळगाव रन ग्रुपमध्ये स्त्री-पुरुष यांचा समावेश होता. या ग्रुपच्या माध्यमातून योगासह मार्निंग वॉक, तीन किलोमीटर रन करण्यातून उत्तम आरोग्याचा मूलमंत्र मिळाला आणि 2016 साली महिला जे.आर. जळगाव रन ग्रुपची स्थापना करुन 50 महिलांची नोंदणी सुरुवातीला झाली. प्रत्येक घरातील महिलांना हाय बीपी, लो बीपी या व्याधींसह ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजार महिलांमध्ये वाढण्याचे प्रमाण दिसून येत आहे. त्यासाठी महिला जे.आर. जळगाव रन ग्रुपच्या महिलांनी संघटीत होऊन त्यावर मात करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

घरातील महिलांनी आरोग्यासाठी घराबाहेर पडावे म्हणून खान्देश सेट्रल मॉल येथे ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 20 रोजी सकाळी 5:30 वा. सुरु होईल तर 7:15 ला संपेल. यामध्ये 3 कि.मी. फन रन, वार्र्‍म अप, तसेच झुंबा डान्स होईल. प्रत्येक रविवारी सागर पार्कला जे.आर.जी. महिला ग्रुप एकत्र येऊन झुंबा करण्यावर भर देतात,
-प्रेमलता सिंग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!