Type to search

Featured शैक्षणिक

video जळगाव : बी.यू.एन.रायसोनी शाळेत विज्ञान प्रदर्शन

Share
Jalgaon

जळगाव

येथील बी.यू.एन.रायसोनी मराठी शाळेत दि.28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान प्रदर्शन’ भरवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सन 2018-19 चे वार्षिक परिक्षेतील बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.पुष्पा पाटील व प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ.रंजना वानखेडे, सौ.मिनाक्षी पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सी.व्ही.रमण व सरस्वती पुजनाने झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात इ.4 थी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या प्रकल्पासह विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनातील माहिती मिळावी यासाठी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनात टाकाऊपासून टिकाऊ वस्तु, छतावरील वाया जाणार्‍या पाण्याचा सदुपयोग, प्लास्टीक निर्मुलन, ग्रीन इंडीया, इंधन बचत आदी प्रयोग ठेवण्यात आले होते.

त्याचप्रमाणे इ.8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची ‘सामान्य ज्ञान’ परिक्षा घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या जीवनावरील आणि विज्ञानातील अनेक घटनांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.पुष्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालक शिक्षक संघ कार्याध्यक्ष सुंर्यकांत लाहोटी व सचिन पिंगळे यांचेसह शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!