Type to search

Featured शैक्षणिक

जळगाव : बी.यू.एन.रायसोनी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणदर्शनाचा कार्यक्रम

Share
BUN

जळगाव

येथील बीयूएन रायसोनी इंग्लीश व मराठी मेडीयम विद्यालयात दरवर्षी आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो. यावर्षी सुध्दा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्यात आले. यानंतर होमगार्डचे माजी द्वितीय समादेशक दिलीप गवळी यांचेहस्ते ध्वजारेहण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांचेसह पालक-शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर विद्यार्थ्यांनी अक्षरश: अंगावर रोमांच उभे राहील व छाती अभिमानाने फुलेल असे पथसंचलन, देशभक्तीपर गीते, स्वच्छता, कराटे प्रात्यक्षीक असे एक ना अनेक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. यात शिशुविहार विभागातील चिमुकल्यांनी राष्ट्रीय पुरूषांची हुबेहुब केलेली वेशभुषा बघून सर्वच थक्क झाले.

२६ जानेवारी हा सगळ्यांसाठीच शुभ दिन व आनंदाची पर्वणी असते. यानिमित्त शाळेचा सर्व परिसर आकर्षक रांगोळ्या, तोरणे-पताका, तिरंगी ध्वज, भारत मातेचा जयघोष, विद्यार्थ्यांनी केलेले सुंदर संचलन हे सर्व बघून सर्वांना आनंद होत होता.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापीका सौ.नलीनी शर्मा, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, चंद्रशेखर पाटील, सौ.रेखा कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!