Type to search

जळगाव शैक्षणिक

बी.यू.एन.रायसोनी शाळा : विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार

Share

जळगाव –

पालक संघातर्फे शिक्षकांचा गौरव

जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या बी.यू.एन.रायसोनी शाळेत शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ.नलिनी शर्मा, चंद्रशेखर पा

टील, विठ्ठल पाटील व सौ.रेखा कोळंबे यांचेसह इंग्रजी व मराठी माध्यमचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचा पालक संघ व संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कार्यभार

शिक्षकदिन हा शिक्षकांचा गौरव करण्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी शिक्षकांना आराम देत शाळेचे संपूर्ण कार्य विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रत्यक्षरित्या भुमीका बजावत संपूर्ण दिवसभर शाळेचा कारभार सांभाळला.
आपल्या आयुष्यात उत्तम शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. एका बालकाचे सुजाण नागरिकामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जवळपास ४० वर्षे भारतीय शिक्षणक्षेत्रात कार्य करून मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षकांचा सन्मान आदर आणि गौरव करणारा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो.

देशाला आणि समाजाला चांगली दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना लाभत असते. या कार्यक्रमात शिशुविहार विभागातील चिमुकल्यांपासून तर दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मनोगत व्यक्त केल्याने त्यांचाही पालक संघाने व गुरूजनांनी कौतुक करून गौरव केला.

शिक्षक जेवढे उत्साही आणि उपक्रमशील असतील तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन शिकवितात तेच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना नेहमी आनंदी ठेवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. मात्र रायसोनी शाळेतील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना हसत खेळत ठेवून सर्वगुण संपन्न करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गळगळाट करून आनंद व्यक्त करत शिक्षकांविषयी असलेले प्रेम या प्रसंगातून व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!