Type to search

जळगाव

बी.यू.एन.रायसोनी शाळेत रंगली चिमुकल्यांची दहिहंडी

Share

जळगाव –

बी.यू.एन.रायसोनी मराठी विभाग शिशुविहार मध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी साजरी करण्यात आली. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी ‘गोविंदा गोपाळा’ म्हणत दहिहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी,

उपाध्यक्ष उमेद रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापीका सौ.रेखा कोळंबे, पालक व शिशुविहार विभागातील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक आशा सोनवणे यांनी राधा-कृष्ण, सवंगडी, गोपीका व दहीहंडीचे पूजन केले. सोज्वल निलेश रोटे ही राधेच्या वेशभुषेत आली व बाळकृष्ण प्रणव कमलाकर सोनवणे याने दहीहंडी फोडली.

रायसोनी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून, लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर, बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. शेवटी सर्वांना गोपाळ काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!