Type to search

Featured जळगाव

जळगाव : मंगल मैत्रेय बुध्द विहाराच्या कोनशिलेचे अनावरण

Share
Jalgaon

जळगाव

जळगाव शहरातील वाघनगर चौक रुक्मिणी नगर, यशवंत भवन परिसरात मंगल मैत्रेय बुध्द विहराच्या कोनशिलेचे अनावरण व बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

धम्म परिषेदेचे उदघाटन व कोनशिला अनावरण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष ॲड.भीमराव आंबेडकर यांच्याहस्ते रविवारी पार पडले.

यावेळी भन्ते अशोक किर्ती थेरो, भन्ते दीपंवरजी थेरो, भन्ते बी. संघपाल, भन्ते धम्मदिप, धम्मदूत डी.एस.तायडे, भारतीय बौध्द महासभेचे राज्याध्यक्ष यु.जी.बोराडे, एस.के.भंडारे, राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई आदींची उपस्थिती होती.

ॲड.भीमराव आंबेडकर यांची फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान करुन शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा श्रीधरनगर, रुख्मिणीनगर, राजीव गांधीनगर, वाघनगर चौकामार्गे मंगलमैत्रीय महाबुद्ध विहार परिसरात शोभायात्रची सांगता करण्यात आली.

यावेळी या शोभायात्रेत भंते कौंण्डन्य यांच्यासह जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष, महिला उपासिका व पुरुष उपासक रॅलीत सहभागी झालेले होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!