Type to search

Breaking News Featured जळगाव मुख्य बातम्या

माझ्या पक्षाची स्थिती मला माहिती आहे, ते बहुतेक त्यांच्या पक्षाविषयी बोलले – शरद पवार

Share
रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले- शरद पवार, Latest News Sharad Pawar Statement Ramnath Wagh Funeral Ahmednagar

जळगाव | प्रतिनिधी 

कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत. पवार म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे त्यामुळे कुणी विलीनीकरणाची भाषा करू नये. शिंदे हे त्यांच्या पक्षाबद्दल बोलले असावेत असे म्हणत पवार यांनी या विषयाला पूर्णविराम दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. त्यावर आज पवार यांनी लक्ष वेधत शिंदे यांच्या वक्तव्याबाबत जास्त विचार करण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.

ते विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!