Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : बोदवड तालुक्यात कोरोना संशयित !

Share
Jalgaon

बोदवड – प्रतिनिधी

जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरसने बोदवडात धडक दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश लक्षणे असणारा संशयित तालुक्यातील तरुणास जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात आज दाखल करण्यात आले. हा (२३) वर्षीय तरुण पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.

तो गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी आपल्या गावी आला होता. काही लक्षणे जाणवल्यामुळे व बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती देण्याचे शासनाचे आवाहन असल्याने गावातील पोलीस पाटील यांनी ही बाब बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून जिल्हा रुग्णालयाच्या टिमने लोणवाडी येथे येत पुढिल योग्य त्या तपासणीसाठी तरुणास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. उद्या दुपारपर्यंत या तरुणाचा तपासणी अहवाल येणार आहे.
कोरोना विषाणूशी मिळते-जुळते लक्षणे दिसून आल्याने संशयित तरुणास पुढिल तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणी नंतर त्या तरुणास कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे सिध्द होणार आहे. अद्याप याबाबतची माहिती मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया तहसिलदार रविंद्र जोगी यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!