Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : बोदवड येथील ग्राम न्यायालय बंद होणार ; न्याय विभागाने काढली अधिसूचना

Share

मुंबई – 

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे तेथील ग्राम न्यायालय बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाने काढली आहे.

जगाव जिल्ह्यातील बोदवड (ता.बोदवड) येथे जानेवारी २०१२ पासून ग्राम न्यायालय स्थापन करण्यात आले होते. मात्र, आता दि.१६ जून २०१९ पासून तेथे नियमित न्यायालय म्हणून दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यात आले असून त्याचे काम सुरू झाले आहे.

त्यामुळे बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्यात आले असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाचे सह सचिव यो.हि.आमेटा यांच्या स्वाक्षरीने ४ डिसेंबर २०१९ रोजी काढली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!