Thursday, April 25, 2024
Homeजळगावबोदवड येथील अत्याचारप्रकरणी तिघांची पोलीस कोठडीत रवानगी

बोदवड येथील अत्याचारप्रकरणी तिघांची पोलीस कोठडीत रवानगी

बोदवड  – 

हैदराबाद येथील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच बोदवड येथे विवाहीत महिलेवर तीन मित्रांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात तिघांविरुद्ध भा.दं.वि.कलम 376, 354, 504 व 34 प्रमाणे संगनमताने कट करणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील फैजपूर पिडीत महिलेला दि.2 डिसेंबर रोजी गुन्ह्यातील आरोपी सद्दाम जानमोहमंद कुरेशी (वय 26, कुरेशी मोहल्ला रा.बोदवड) याने फोन करीत आपण नातलग असल्याचे सांगत बोदवड येथे भेटण्यासाठी बोलावले होते.

पिडीता बोदवड येथील बसस्थानकावर आली असता सद्दाम याने पीडित महिलेस तेथे उभ्या असलेल्या लाल रंगाच्या मालवाहू गाडीत बसवून शहराबाहेर नेत एका ताटी पत्र्याच्या शेडमध्ये सद्दाम जानमोहमंद कुरेशी व शेख आबिद शेख बिस्मील्ला कुरेशी (वय 24 रा.कुरेशी मोहल्ला, बोदवड) तसेच शेख इम्रान ईस्माईल कुरेशी (वय 24 रा.सतरंगी मोहल्ला, बोदवड) या तिघांनी पिडीत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यावेळी पिडीत महिलेने त्यांच्यासोबत झटापट करीत तेथून पळ काढला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याचीही धमकी तिघांनी पिडितेस दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, मुक्ताईनगर उपविभाग पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी पथक नेमून व सापळा रचून गुन्ह्यातील तिन्ही संशयिताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर यांसह इतर ठिकाणांहून दि.10 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली असून याआधीच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन बोदवड पोलिसांनी जप्त केले आहे.

पथकात बोदवड पोलिस निरीक्षक सुनील खरे, स्थानिक गुन्हे शाखेचे तांत्रिक तपासणी अधिकारी श्री.वारुळे,पोलिस नाईक गोपाल गव्हाळे, पोलिस कास्टेबल महेंद्र लहासे, संदीप वानखेडे, राहूल जोहरे, निखिल नारखेडे, मनोज पाटील, उद्दल चव्हाण यांचा समावेश आहे.

गुन्ह्यांतील तिन्ही संशयिताना मंगळवारी बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती एस.डी.गरड यांच्या न्यायालयाने त्यांना 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या