Type to search

जळगाव राजकीय

बोदवड येथे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत

Share

बोदवड । भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी 12 वाजता दिल्लीत अखेरचा श्वास घेतला तर बोदवड शहरात 12.31 वाजता ढोलताशांच्या गजरात शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोदवड शहरात दाखल झाले. त्यांच्या समवेत माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हा बॅकेंच्या अध्यक्षा ऍड. रोहीणीताई खडसे- खेवलकर व स्थानिय कार्यकर्ते होते.

दुपारी साडेबारावाजेदरम्यान बोदवड शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाले. त्यानंतर प्रचंड आतिषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाजनादेश यात्रेची लक्झरी रथ दाखल झाल्यानंतर सर्व नेत्यांनी हसतमुखाने जनतेला शुभेच्छा दिल्यात. नंतर आ. एकनाथराव खडसे यांनी भाषणास सुरूवात केली. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेच्या वतीने स्वागत करून खडसेंनी भाजपाने प्रचंड विकास केल्याचे सांगितले. त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्र्यांनी बोदवडकरांना संबोधित केले. व भाषण आटोपून महाजनादेश यात्रा बोदवड शहरातून रवाना झाली.

तरूणाने दाखविले काळे झेंडे
मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण संपताच, त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तरूण कार्यकर्ते सागर पाटील यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. बोदवड शहरात पिण्याचे पाणी 20-25 दिवसाआड येत असून तुमच्या घोषणा फसव्या असल्याचे म्हटले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सागर पाटील यांच्याकडील काळे झेंडे काढून घेतले व पुढे जनादेश यात्रा मार्गस्थ झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!