Type to search

Breaking News जळगाव राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

निवडणूक कामात २१ बिएलओंची दिरंगाई : निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बजावली नोटीस

Share

मतदारांना मतदान चिठ्ठयांचे वेळेवर वाटप नाही

जळगाव (प्रतिनिधी) –

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव शहर विधानसभा क्षेत्रातील कार्यरत बीएलओंना दिलेल्या मुदतीच्या आत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे काम देण्यात आले होते. ते विहित मुदतीच्या आत न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिपमाला चौरे यांनी विजय दामोदर पाटील यांचेसह अन्य २१ बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे म्हटले आहे.

जिल्हयातील अकरा विधानसभा मतदार संघात २१ आक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया होत असून अजुनही विहित मूदतीत मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले नसल्याचे मतदारांनी सांगीतले. यात बीएलओ क्रमांक १ ते ७ व २८३ ते २९६ असे २१ बीएलओंनी निवडणूक कामात कुचराई केली असल्याचे आढळून आले आहे. तसेच स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता संबधित बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले.

मतदारांना वोटर स्लिप घेण्यासाठी घरी बोलावले जाते किंवा वेळेत दिल्या जात नाहित यावरून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदेश गांभीर्याने न घेता दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच यापूर्वी देखिल तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने आपणाविरूद्ध कारवाई का करू नये या संदर्भात २४ तासाचे आत खुलासा करावा अशा आशयाचे आदेशीत केल असल्याचे जळगाव शहर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी चौरे यांनी म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!