Type to search

maharashtra जळगाव राजकीय

डौलाने फडकले भाजपध्वज

Share
जळगाव । भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा भाग असलेल्या केंद्रापासून ते बूथ स्तरापर्यंत तीनस्तरीय अभियानातील पहिल्या टप्प्यातील पक्षध्वज व स्टीकर मोहीम मंगळवारपासून जळगावातही सुरु करण्यात आली. या मोहिमेत भाजपचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य पदाधिकारी यांच्यापासून बूथ स्तरावरील कार्यकर्ते घरांवर भाजपचा ध्वज व ‘माझे कुटुंब-भाजप कुटुंब’चे स्टीकर लावणार आहेत. हा टप्पा 2 मार्चपर्यंत राबविला जाईल. यात बूथ स्तरावर घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्कही साधला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले.

आमदार सुरेश भोळे व महापौर सीमा भोळे यांच्या घरापासून शहरातील अभियान सुरू झाले. याप्रसंगी भाजप गटनेते भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, बालकल्याण सभापती मंगला चौधरी, नगरसेवक उज्ज्वला बेंडाळे, सुचिता हाडा आदी उपस्थित होते. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे. या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात कमळज्योती संकल्प दीपक प्रज्वलन तर तिसर्‍या टप्प्यात 10.30 वाजेपूर्वी मतदान मोहीम राबविली जाणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांना प्रत्येक राज्यात सक्रिय ठेवण्यासाठी शक्ती केंद्रप्रमुखांचे संमेलन हा यासाठी अभियानपूर्व टप्पा होता. या संमेलनात 5 बूथचे एक शक्ती केंद्र बनवून त्यांची जबाबदारी मंडळस्तरीय कार्यकर्त्यांना दिली गेली आहे. त्यात शक्ती केंद्रप्रमुखांना 5 बूथवरील सदस्य व लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. या यादीतील सर्व मतदारांशी 2 मार्चपूर्वी संपर्क साधला जाणार आहे.

अभियानाच्या तिसर्‍या टप्प्यात, ‘10.30 वाजेपूर्वी मतदान’ मोहिमेत वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क बळकट केला जाणार आहे. याद्वारे नागरिकांना मतदान केंद्रावर घेऊन जात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, हा उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातील विद्यापीठांत युवा संसद भरविली जाणार आहे. 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’मधून संवाद साधणार आहेत. याशिवाय पोस्टल मतदानाचा फायदा मिळवण्यासाठी 3 मार्चपर्यंत ‘सैनिक सन्मान’ मोहीमही राबविली जाणार आहे. शेतकरी, महिला, अनुसूचित जाती-जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक व युवा आघाड्यांतर्फे 8 मार्चपर्यंत राष्ट्रीय अधिवेशने घेतली जाणार आहेत. याशिवाय भाजपने निवडणूक प्रचार अभियानासाठी देशभरात सुमारे 80 प्रकाशन केंद्रे बनवली आहेत. या ठिकाणी पक्षाशी संबंधित साहित्य, प्रचारसामग्री उपलब्ध आहे.

कमळाच्या आकाराचे दिवे
भाजपाने निवडणूक रणनीतीचा भाग म्हणूनच 11 फेब्रुवारी रोजी पं.दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिन’ कार्यक्रम घेतला. अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात 26 फेब्रुवारीला बूथ पातळीवरील भाजप कार्यकर्ते व समर्थकांच्या घरी ‘कमळ’च्या आकाराचे दिवे पेटवले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या घरीही दिवे पेटवणार असल्याचे वाघ यांनी ‘देशदूत’ला सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!