आता हरलो तर कुणीही माफ करणार नाही

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू : शक्तिप्रमुखांच्या संमेलनात भाजपचे शक्तिप्रदर्शन

0
जळगाव । मोदींसारखा नेता, अमित शहांसारखे स्ट्रॅटेजी ठेवणारे लोक, आपल्यासाखे देवदुर्लभ कार्यकर्ते यांचा संगम असताना जर निवडणूक हरलो तर कोणी आपल्याला माफ करणार नाही, असे सांगत निवडणुका या केवळ कार्यकर्त्यांची मेहनत व संघटनेच्या बळावरच जिंकता येतात, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केले. जळगावातील अटल नगरात रविवारी भाजपच्या चार लोकसभा मतदारसंघातील शक्तिप्रमुखांचे संमेलन पार पडले, यावेळी ते बोलत होते. प्रत्येक बूथपर्यंत भाजपची कामे पोहचवायची आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

विधानसभा क्षेत्रानुसार सुमारे 1500 शक्तिप्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस रामदास आंबटकर, खासदार रक्षा खडसे, खासदार ए. टी. पाटील, खासदार हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार विजयकुमार गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, महापौर सिमा भोळे, धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी केले.

विजयाचा जो दावा केला तो आतापर्यंत प्रत्यक्षात उतरविला असल्याचे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. दरम्यान, नाथाभाऊ जरी दोघ खासदारांसमोर उमेदवार नसल्याचे सांगत असले तरी अजून याला वेळ आहे, आधीच उमेदवारी जाहीर केली तर हे कामात कचुराई करतील, अजून भरपूर कामे करायची आहे, असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांना वर्षभर कष्ट करून एक लाख रूपये मिळत नाही मात्र, मोदी सरकारने त्यांना दीड लाख कर्जमाफी दिली ही मोठी गोष्ट आहे. जिंकणार तर आहोत पण मताधिक्य वाढवायचे आहे, गेल्या पाच वर्षात काय केले ते लोकांना सांगायचे आहे, आहे त्या जागा टिकवायच्या आहे, जिंकून आणायच्या आहे, असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले. सरचिटणीस आंबटकर यांनी संपूर्ण प्रक्रिया यावेळी पदाधिकार्‍यांना समजावून सांगितली. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आंचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. चार वर्षात सगळ्यांच सगळ समाधान होणे अवघड आहे, गेल्या चार वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यांना दिलासा दिला आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यानी केले.

काय म्हणाले जाजू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चार वर्षांच्या कार्यकाळात इतकी कामे केली आहे की सांगता येणार नाही, 188 मते मिळवून आपण युनायटेड नेशनचे व सदस्य झालो. ज्यांच्यावर आयकरची रेट पडतेय, ज्यांना जीसएसटी भरावा लागतो ते मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. मात्र विकासाच्या मुद्यावर जनता आमच्या बरोबर आहे, आव्हान हे आहे की, आम्ही किती अग्रेसीवली त्या लोकांपर्यंत जावून आमच्या कामांचे वर्णण करतो. जोपर्यंत आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविणार नाही, जागृती करणार नाही तो पर्यंत लोक मतदान करणार नाही. शत्रूपक्षाला डोळे वटारून बघणारा प्रधानमंत्री पाहिजे की, संसदेत डोळा मारून मजा करणारा हे लोकांना सांगायचे आहे. कार्यकर्ते मेहनत करीत नाही तोपर्यंत पार्टी जिंकत नाही. संघर्षातून उभा राहिलेला हा पक्ष आहे,

वंदे मातरम आणि टाळ्यांचा कडकडाट
मालेगाव सेंट्रल येथील शक्तिप्रमुखांमध्ये सर्व मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने त्यांच्या आगमनानंतर सभागृहात टाळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. अनुभव मांडताना मुस्लीम कार्यकर्ते यांनी वंदे मातरम म्हणताच सभागृहातून टाळ्यांचा कडकडाट व घोषणाबाजी सुरू झाली. मुस्लीम समाजही आज मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पाठीशी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

शायरीने आणली रंगत
राख तले चिंगारी रख
कुछ तो पर्दादारी रख
राख तले चिंगारी रख
कुछ तो पर्दादारी रख
अमन जरूरी हे लेकीन
जंग की भी तयारी रख
– चैनसुख संचेती

LEAVE A REPLY

*