भाजपचे नगरसेवक घेणार प्रभाग दत्तक

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता, शहरात विकासकामे करण्यासाठी प्रभाग दत्तक घ्यावे, अशी सूचना आ.राजूमामा भोळे यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिली.
आपआपल्या प्रभागांव्यतिरिक्त अन्य प्रभाग दत्तक घेतल्यानंतर त्या-त्या प्रभागात कामे करण्यासाठी आमदार-खासदार निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे नुकतेच मुंबईमध्ये येवून गेले. त्यावेळी त्यांनी राज्यातील मंत्र्यांसह सर्व आमदारांची बैठक घेवून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत आणि प्रत्येक आमदारांच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला होता.

त्याच पार्श्वभूमीवर आ.राजूमामा भोळे यांनी पद्मालय विश्रामगृहात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली.

यावेळी वामनराव खडके, गटनेता सुनिल माळी, पृथ्वीराज सोनवणे, रविंद्र पाटील, डॉ.अश्विन सोनवणे, विजय गेही, अनिल देशमुख, नवनाथ दारकुंडे, ज्योती चव्हाण, दिपमाला काळे, अ‍ॅड.शुचिता हाडा, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*