Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव, भुसावळचा पारा पोहोचला 44 अंशसेल्सिअसवर!

जळगाव, भुसावळचा पारा पोहोचला 44 अंशसेल्सिअसवर!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत जिल्ह्याचे तापमानात वाढ (temperature) झाली आहे. कोकणाकडून (Konkan) वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे (hot winds) उष्णतेची तीव्र लाट (heat waves) आल्याने दि. 17 मार्च रोजी जळगाव जिल्ह्याचा पारा 44 अंशसेल्सिअसवर नोंदविला गेला आहे. मार्च महिन्यात यंदा सरासरीपेक्षा 3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हात जास्त काम न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याचे तापमानात (temperature) दिवसागणिक वाढत आहे. दि.14मार्च 40 अंशावर तर दि. 15 रोजी 41 अंशावर आला होता. तब्बल चारच दिवसानंतर 17 मार्च रोजी जळगावचे तापमान 44 अंश सेल्सिअसची (44 degrees Celsius) नोंद झाली आहे. मार्च महिन्यात नेहमी सरासरी 40 ते 42 अंशादरम्यान तापमान असते.

मात्र यंदा सौराष्ट्र, मध्यप्रदेशात उष्णतेची लाट (Heat wave) आली असून त्यामुळे तापमान अचानक वाढले आहे.तापमानाने अचानक उच्चांक घेतल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भरपूर पाणी पिणे तसेच ताक, ऊसाचा रस, लस्सीसारखे पेय घेऊन शरीर थंड ठेवण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे केळीच्या (Bananas) बहराला धोका निर्माण आहे. तो जळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा हिवाळा ऋतू लांबला असून मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हळ्याच्या (summer) सुरुवातीला पाऊस, थंडी आणि उन्हाचे चटके अशा विचित्र घटनाचा संगम घडून आला असून गुरुवारी अचानक तीन अंशाने तापमान वाढल्याचा अंदाज वेलनेस फाउंडेशने वर्तविला आहे.

सध्या अचानक तापमान वाढल्यामुळे उन्हात जास्त काम करणे किंवा फिरणे टाळावे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. तसेच शरीरात पाणी कमी होऊ नये म्हणून सतत पाणी पित (drinking water) राहावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या