Type to search

जळगाव

रावण दहन करण्यासाठी समाजाने शक्ती द्यावी – आ.संजय सावकारे

Share

भुसावळ/यावल । समाजातही अनेक वाईट प्रवृत्ती वाढल्या असून अशा प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी समाजाने शक्ती द्यावी,असे आवाहन आ.संजय सावकारे यांनी येथे केले.

विजयादशमीनिमित्त मंगळवारी रात्री जय मातृभूमी मंडळातर्फे भुसावळ येथिल टी.व्ही.टॉवर मैदानावर रावणासह मेघनाथ व कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते रावण, आ. संजय सावकारे यांच्या हस्ते तर मेघनाथाचे दहन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले. खा. खडसे, नगराध्यक्ष भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी भाजपा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, विजय चौधरी, राजेंद्र पुंडलिक चौधरी, राजेंद्र नाटकर, उद्योजक मनोज बियाणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, किशोर पाटील, अ‍ॅड. निर्मल दायमा, रजनी सावकारे, संगीता बियाणी यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजातील वाईट चालीरीती, अनिष्ठ रुढींचा नायनाट करण्यासाठी रावणदहन- अ‍ॅड. उज्वल निकम
समाजातील वाईट चालीरीती, अनिष्ठ रुढी परंपरा यांचा नायनाट करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात रावणदहनाचा कार्यक्रम आपण करीत असतो. समाजातील गुन्हेगारांची लंका उध्वस्त करण्यासाठीच माझा जन्म हनुमान जयंतीला झाला आहे. हनुमानानेही लंका जाळली होती.आतापर्यंत 648 गुन्हेगारांना जन्मठेप व 50ते 51 गुन्हेगारांना फासावर लटकवले आहे. काही विध्वंसक लोक समाजातील शांतता व एकोपा बिघडवण्याची कामे करत आहेत. अशा विध्वंसक प्रवृत्तीचे लोक विघातक शक्तींना थारा देतात. त्या लोकांचा निषेध केला गेला पाहीजे, आपला देश सर्व जाती, धर्मांनी एकत्रीतपणे नांदणारा सर्वसमावेशक असा देश आहे. देश गुण्यागोविंदाने शांततेत नांदत असतांना, अशांचेही प्रतिकात्मक रावण दहन आपण केले पाहीजे.असे प्रतिपादन राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी केले.

यावल येथे श्री. छत्रपती शिवाजी मित्रमंडळातर्फे आयोजित रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. महर्षी व्यास मंदिराजवळ नदीपात्रात रावण दहन झाले. प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, पो.नि. रविकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कदीर खान, अनिल जंजाळे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. एस. के. बाऊस्कर यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. हेमंत येवले, प्रविण घोडके, अमोल दुसाने, अमोल भिरुड, तुकाराम बारी, कामराज घारु, अरुण लोखंडे, प्रभाकर वाणी, विवेक देवरे,संतोष कवडीवाले, गनी खान, शेख सईद यांनी सहकार्य केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!