Type to search

जळगाव

अंजनसोंड्यात सापडला गावठी कट्टा

Share

वरणगाव । वार्ताहर – तालुक्यातील अंजनसोंडा येथील सोनू उर्फ प्रशांत नितीन कोळी (वय 22) याने गावठी कट्टा घेऊन काढलेला फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सात ते आठ महिन्यापूर्वी त्याचा मित्र दीपक गोपाळ कोळी (रा.अंजनसोंडा) त्याच्याकडून काही दिवसासाठी कट्टा घेतला होता तो घेऊन आयुध निर्माणी कर्मचारी येथील वसाहतीतील रहिवासी दुसरा मित्र स्वप्निल निरंजन पाटील व अजय काशिनाथ कोळी यांच्याकडे कामानिमित्त गेला असता सदर चा कट्टा त्याचा मित्र स्वप्नील पाटील व अजय कोळी यांना दाखविला.

त्यावेळी कुतूहलाने ते बघत त्या कट्या सोबत फोटो काढले व कट्ट्या याबाबत कोणाशी बोलू नये असे धमकावून पुन्हा हा कट्टा परत केला. याबाबतचे फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर चौकशी केली असता दीपक कोळी याच्याकडे 8 हजार रुपये किमतीचा कट्टा व पन्नास रुपये किमतीचे काडतूस आढळून आले. याप्रकरणी हवलदार सिताराम तायडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शना खाली तपास करण्यात येत असून संशयित आरोपी दीपक गोपाळ कोळी (वय 22) व सोनू उर्फ प्रशांत नितीन कोळी (दोघे रा.अंजनसोंडा) यांच्याविरुद्ध विनापरवाना गैरकायदा गावठी कट्टा कब्जात बाळगल्या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही संशयितांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता पीआर बाँड वर सोङण्यात आले. वरणगावात कट्टा, तलवारी-अंजनसोंडा येथे गावठी कट्टा सापडल्याने गुन्हेगारी क्षेत्र वाढीस लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात अजूनही कसून तपास घेतल्यास गावठी कट्टा व तलवारी निश्चित सापडतील अशा प्रकारची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!