Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

भुसावळात 17 तास विजपुरवठा खंडीत

Share
भुसावळ । दीपनगर येथील सबस्टेशन मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागून शहरातील काही भागात तब्बल 17 तास विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान दि.19 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विज कंपनीच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरु करुन रात्री उशीरापर्यंत विज पुरवठा सुरळीत केला.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दीपनगर सबस्टेशन मध्ये दि. 19 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ब्रेकर वायरिंगमध्ये खराबी होवून फॉल्ट झाल्यामुळे सब स्टेशनमध्ये आग लागली होती .शहरातील खडका रोड,शिवाजी नगर, रेल्वे वर्कशॉपसह कंडारी परिसरातील 20 डीपींवरील विज पुरवठा रात्री 8 वाजे नंतर खंडीत विज पुरवाठा सुरळीत झाला. दरम्यान शहरातील अन्य भागातील विज पुरवाठा तात्काळ सुर करण्यात आला होता. विज कंपनीच्या कार्यकारी अभियंता व ट्रान्समिशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवित. विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु करुन रात्री 8 वाजे नंतर विजपुरवठा सुरळीत केला. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानाचा अंदाज स्पष्ट झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

विज पुरवठा खंडीत झाल्यांनतर विज कंपनीच्या वतीने संबंधित परिसरातील नागरिकांच्या मोबाईलवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याबाबात मोबाईल वर एसएमएस पाठवून सुचना देण्यात आली होती. युद्धपातीळीवर काम सुरु करुन रात्री उशीरा विजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, पहाटे पासून विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कडक उन्हाळ्यात विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रोजेदारांना मुस्लिम बांधवांनाही त्रास सहन करावा लागाला. सायंकाळी रोजा अप्तारी सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांना मस्जिदमध्ये पाण्याची टंचाई झाली. यामुळे वजू करण्यासा अडचणी आल्या. तसेच सकाळी 4.30 वाजता अंधारातच रोजा सुरु तसेच सायंकाळीही अंधारातच रोजा सोडावा लागल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!