Type to search

जळगाव

आयुध निर्माणी कर्मचार्‍यांचा संप तूर्त मागे

Share

भुसावळ । केंद्र सरकार आयुध निर्माणीचे कार्पोरेशन करून खाजगीकरण करण्याच्या तयारीत असल्याने येथील आयुध निर्मातील कामगार युनियन, इंटक युनियन व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तिन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी 20 पासुन महिनाभराचा संप पुकारला होता. हा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला असुन हा संप स्थगित झाल्याचे संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी कळविले आहे. दि. 26 पासून सर्व कामगार कामवर येणार आहे.

फेडरेशनच्या नेत्यांची रक्षा सचिवांसोबत झालेल्या बैठकित आयुध निर्माणींना 30 हजार करोडचे उत्पादन दिले जाईल. ते वरीष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीत पूर्ण केल्यास निगमी करणाचा विचार करू असे ठरले. या लेखी आश्र्वावासनानंतर फेडरेशने संप मागे घेतला असलयाचा संदेश पाठविले आहेत.

चार दिवस फॅक्टरीत वर्ग 1 व वर्ग 2 अधिकारी गेले होते मात्र निर्माणीत कामगार नसल्याने संप. 100 टक्के यशस्वी झाला. संपाच्या पाचव्या दिवशी वर्ग दोन अधिकारी संपात सहभागी झाले होते. देशातील रक्षा उत्पादनात सध्या 41 आयुध निर्माणी, 9 शिक्षण संस्थान मधील एक लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते. निगमीकरणाला या आधी कामगार संघटनांनी विरोध केला असतांना सरकार निर्णयावर ठाम असल्याने कामगारात असंतोष निर्माण झाला होता.
संपादरम्यान आ. संजय सावकारे, पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, शिवसेना चंद्रकांत पाटील, वरणगांव नगराध्यक्ष सुनिल काळे, राष्ट्रवादी नगरसेवक राजेंद्र चौधरी, आदींनी भेटी दिल्या होत्या, संपाच्या 5 दिवसात घोषणा, अर्धनग्न आंदोलन, अधिकार्‍यांवर बांगड्या फेकणे, परिवारासहीत आंदोलन करण्यात आले.

संपकाळात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरणगांव पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप बोरसे, हे.कॉं. नागेंद्र तायडे, दत्तात्रेय कुलकर्णी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

यशस्वीतेसाठी बी. बी. सपकाळे, शरद पाटील, देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, रवी देशमुख, किरण पाटील, सुनील महाजन, विशाल भालशंकर, राजेंद्र शेटे, प्रवीण पाटील, गणेश भंगाळे, के. के. सिंग, सुधीर गुरचल, सचिन झोपे, लक्ष्मण तायडे, संतोष बार्‍हे, मनीष महाले, सुहास विभांडीक, दीपक पाटील, वाल्मिक खोरकड, प्रशांत ठाकूर, रवी बोरसे, डी. एम. पाचपांडे, योगेश सुर्यवंशी, हर्षल सुतार, महेश देशमुख, नीलेश घुले, जयश्री झोपे, योगेश ठाकरे, अर्चना बोरोले यांच्यासह कामगार, इंटक, भा. म. संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आयुध निर्माणीच्या संपाला पाठिंबा
भुसावळ । जिल्हा कॉंग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी ऑर्डनस फॅक्टरी निगमीकरणाच्या विरोधात येथे सुरु असलेल्या कर्मचार्याच्या संपात सहभागी होवून जाहीर पाठिंबा दिला. तसेच आयुध निर्माणींच्या खाजगकरणाला कॉंग्रेसचा विरोध असल्याचे यावेळी सांगून कामगारांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील व विवेक नरवाडे, मुकेश सोनवणे, रवि साळुंके, समाधान इंगळे व आयुध निर्माणी कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!