Type to search

भुसावळात तरुणीचा निर्घृण खून

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

भुसावळात तरुणीचा निर्घृण खून

Share
भुसावळ । येथील जळगाव रोडवरील लोणारी मंगल कार्यालयाजवळ हुडको कॉलनी येथे एका तरुणीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. आरोपीने खून केल्यानंतर पोलीस येईपर्यंत तो घटनास्थळी उभाच होता. दरम्यान, दुपारी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटनाही उघडकीस आली. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची धामधूम सुरू असताना प्रीती ओंकार बागल (वय 22) ही तरुणी तिच्या बहिणी सोबत अभिवादन करून घरी परत आली. त्यानंतर ती हापसीवर पाणी भरत असताना संशयित आरोपी सागर इंगळे हा तरुण त्या ठिकाणी आला. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुझी बदनामी करेल असा दम दिल्यानंतर तरूणांने खिशातून चाकू काढून तरुणीवर वार केला. पोटात चाकू भोसकल्यामुळे तरुणी जमिनीवर कोसळली. त्यावेळी त्याने त्या तरुणीच्या कमरेवर पाय ठेवून चाकू काढून दुसरा वार केला. जखमी अवस्थेत तरुणी जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत समोरच्या घरात गेली. मात्र तिची प्राणज्योत मालवली.

काही दिवसापासून संशयित देत होता त्रास
संशयित आरोपी इंगळे यांचा गेल्या काही दिवसांपासून मयत प्रीतीला खूपच त्रास होता. या त्रासाला कंटाळून त्या मुलीसह बहिणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती . मात्र पोलिसांनी त्यांना थातूरमातूर कारण सांगून जीवाची भीती दाखवून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. असा आरोप मयत तरुणीच्या बहिणींनी केला आहे.तक्रारीची दखल घेतली असती , तर हा खून झाला नसता असे प्रीतीची बहिणी टाहो फोडून बोलत होती . प्रीती हिचे वडील वारले असून आई व सहा बहिणी सह ती राहत होती . प्रीतीने आयटीया पर्यंत शिक्षण घेतले असून नुकताच तिने रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप दिली आहे .

भुसावळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
भुसावळ शहरात एकाच दिवशी दोन महिलांचे खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे.

संशयिताला अटक
संशयित आरोपी इंगळे हा वार केल्यानंतरही घटनास्थळी रिक्षाच्या आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. व त्यांनी त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या. प्रीतीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!