Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

भुसावळ : भाजप नगरसेवकासह कुटूंबातील चौघांची हत्या

Share

भुसावळ/जळगाव । शहरातील समतानगर परिसरात भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह परिवारावर दोघांनी हल्ला चढविला.

यात रवींद्र खरात, त्यांचा भाऊ सुनील खरात, मोठा मुलगा प्रेमसागर खरात, लहान मुलगा रोहीत खरात, भाचा सुमीत गजरे या पाचही जणांचा मृत्यू झाला, तर रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात या गंभीर जखमी झाल्या आहेत.

ही घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी भुसावळला भेट देवून माहिती घेतली.

दरम्यान, रात्री उशिरा तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यात राज अख्तर खान, राजा मोघे व मयूर सुरवाडे यांचा समावेश आहे. या हल्ल्यात राजकीय लोकांचा हात असल्याचा आरोप खरात यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

रात्री 9.30 वाजेच्या सुमारास नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात हे आपल्या घरासमोर बसलेले असतांना पायी आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर त्यांचे बंधू सुनील खरात (वय 47) हेे पुढे येत असताना हल्लेखोर दोघांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला.

यात सुनील खरात यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रस्त्यावर एक चाकू आढळून आला तर हल्लेखोर शेजारच्या घरात घुसल्याने त्या ठिकाणीही एक हत्यार आढळून आले. यावेळी रजनी रवींद्र खरात याही रस्त्यावर आल्या असता, त्यांच्यावरही हल्ला चढवत गंभीर जखमी केले.

तर रवींद्र खरात व त्यांची दोन्ही मुले रोहित (वय 20) व प्रेमसागर (वय 28) यांच्यावरही जवळच असलेल्या लाल चर्चजवळ हल्ला केला. त्याठिकाणी दोन गोळ्या आढळून आल्या. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, मृत घोषित केले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रवींद्र खरात व सुमीत गजरे यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, या दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. जदरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नगरसेवक रवींद्र खरात यांच्या पत्नी रजनी खरात यांना उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेनंतर खरात यांच्या घराजवळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत कडक बंदोबस्त ठेवला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पो.नि.दिलीप भागवत, शहरचे पो.नि.बाबासाहेब ठोंबे, पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी तत्काळ शहरा

त दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकीच्या काळात शहरात झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गोळीबारातील मयत

1) रवींद्र बाबुराव खरात

2) सुनील बाबुराव खरात
3) प्रेमसागर रवींद्र खरात
4) रोहित रवींद्र खरात
5) सुमीत गजरे

गुन्हेगारांवरील वचक संपला

भुसावळ शहर हे गुन्हेगारीचे केंद्र मानले जाते. त्यामुळे महिना-दोन महिन्यात येथे हत्या किंवा दरोड्याचे प्रकार वारंवार सुरू असतात. यासाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असणे आवश्यक असले तरी गेल्या चार ते पाच महिन्यांची परिस्थिती पाहता, पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भुसावळमधील गँगवर शांत असले तरी अधून-मधून कूरघोड्या सुरूच असल्याचे दिसत होते. आजची घटना त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

दोन दिग्गजांच्या समावेशाचा नातेवाइकांचा आरोप

दरम्यान, या घटनेत रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालेला असतानाच, या हत्याकांडामागे भुसावळातील दोन दिग्गज राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप मयतांच्या नातेवाइकांनी केला आहे. जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री नातेवाइकांची एकच गर्दी झाली होती. यावेळी हा आरोप करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!