Type to search

जळगाव

भुसावळात किरकोळ कारणावरुन वाद : 41 जणांवर परस्पर गुन्हे

Share
कापूस विकू दिला नाही पित्याचे दगडावर डोके आपटले, Ashvi Crime News Sangmner

भुसावळ । येथील पंधरा बंगला भागात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात 41 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंधरा बंगला भागात राजु आवटे यांच्या दुध डेअरी समोरे रोडवर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी यांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याने ते काम सोड असे सांगितले मात्र काम सोडणार नसल्याचे सांगितल्याने आरोपींना राग येवून ब्लेड व लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी शे. इमरान शे.गुलाम रसुल (वय 30 रा. 15 बंगला) मारहाण करुन जखमी केले. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रकाश निकम, विनोद निकम, रामदास निकम, आकाश निकम, अजय निकम, संजय निकम, आनंद नरवाडे, सुरेश नरवाडे, मनोज निकम, रोहित शेळके, गौरव वाघ, पिंट्या निकम, गोलू निकम, पुष्कराज शेळखे, सोनू निकम, दादू निकम, बंटी निकम, पप्पू निकम, शिवा ग्यानसिंग, हर्षल शिंदे, मोहन निकम, राजेंद्र वाघ (सर्व रा, 15 बंगला) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसर्‍या गुन्ह्यात, तु विनोद निकम सोबत का राहतो या कारणावरुन रिपाई जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी व दीपक सूर्यवंशी यांनी मारहान केली. याबाबत आनंद नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, रोहित सूर्यवंशी, शे. इमरान शे. गुलाम, शे. शाकीर, हबीब शेख, शे. हुसेन, शेख युसुफ व दोन्ही मुले (नाव माहित नाही), किशोर वानखेडे, शहरुख शेख व त्याचे वडील (नाव माहित नाही), प्रिंस (पूर्ण नाव माहित नाही), शामी , आसिफ, हार्षद सोनार, विवेक जावरे, गौरव कापडणे (सर्व रा. 15 बंगला) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. बाजारपठे पोलिसात गुरनं 444 व 445/19, विविध कलमांसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अला आहे.तपास सारिका खैरनार करित आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!