Type to search

जळगाव राजकीय

भाजपाच्या गडांवर शिवसेनेचा दावा

Share

आशिष पाटील
भुसावळ । आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने सर्वच पक्ष सध्या मतदारसंघ काबिज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यात भाजपा-शिवसेना युती असली तरी निवडणुकीत जिल्हा शिवसेनेच्या वतीने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या ताब्यातील भुसावळ, मुक्ताईनगर व रावेर या तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपासमोर यक्ष प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण होणार असल्याचे समजते. यातून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. थोडक्यात भाजपाच्या गडांवर शिवसेनेचे पंजा मारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

मागील निवडणुकीत पक्ष ज्या ठिकाणी दुसर्‍या स्थानी आहेत, त्या-त्या विधानसभा मतदारसंघांची नैसर्गिक हक्काने पक्षाकडे मागणी करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील पाचपैकी एकाच (चोपडा) विधानसभा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहे. अन्य मतदारसंघात मागील 25 वर्षांत मतदारसंघांनी सेनेलाही पसंती दिली आहे. यामुळे भुसावळ, मुक्ताईनगर व रावेर मतदारसंघांची मागणी 7 रोजी खा. संजय राऊत यांच्याकडे केली आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी पोहोचविली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले. पक्षाने लोकसभा निवडणुकीदरम्यान, मुक्ताईनगरची जागा आपल्यासाठी सोडणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य- भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाकडे चार तगडे इच्छुक उमेदवार आहेत. त्यात स्थानिक दोन तर बाहेरील दोघांचा समावेश आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांकडून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार स्थानिकांसह चौघा इच्छुकांची नावे 7 रोजी पक्षाकडे देण्यात आली आहे.

तयारी- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. भुसावळ मतदारसंघात 360 बूथप्रमुखांसह, गावागावांत शाखा, प्रत्येक वॉर्डात बूथप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. युती का वादा, आधा आधानुसार रावेर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी किमान 3 जागा पक्षाला मिळण्याच्या दृष्टीनेही तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षाची पिछे हाट असल्याचे सांगण्यात येत असले तरी तालुक्यातील एक जिल्हा परिषद, एक पंचायत समिती, भुसावळ व वरणगावात 1-1 नगरसेवक यासह अनेक ग्रामपंचायतींवर पक्षाचे सदस्य असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. मतदारसंघासाठी पक्षाकडून जवळपास 11 जण इच्छुक असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!