Type to search

भुसावळ येथील नगरसेवकाच्या भावाचा मृत्यू ,14 जखमी

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

भुसावळ येथील नगरसेवकाच्या भावाचा मृत्यू ,14 जखमी

Share
भुसावळ । राजस्थानमधील जोधपुर येथे कुलदेवतेचे दर्शन घेऊन वैष्णोदेवीला जाणार्‍या येथील भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात येथील नगरसेवक निर्मल (पिंटु) कोठारी यांच्या भावाचा मृत्यृ तर 14 जण जखमी झाल्याची घटना दि. 17 रोजी पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील जामनेर रोडवरील बद्री प्लॉटमधील रहिवासी तथा नगरसेवक निर्मल(पिंटू)कोठारी यांचे बंधू सुजित रमेशचंद्र कोठारी हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी जात होते. त्यांनी जोधपूर येथील कुलदेवता अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन ते पुष्करमार्गे अमृतसरकडे वैष्णोदेवीला जात असताना दि.17 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अजमेर जवळील थावला येथे पुढे चालणारा ट्रेलर चढावावर मागे येत असताना चालक अकबर पटेल याने प्रसंगावधान राखून समोरून ओव्हरटेक करीत पुढे जाण्याच्या प्रयत्नात जात असताना समोरून येणार्‍या बस व भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये समोरासमोर धडक झाली.

या अपघातात सुजित कोठारी हे ठार झाले तर त्यांच्या कुटुंबातील 14 जण जखमी झाले असून जखमींवर अजमेर येथील जेएलएन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर जखमींना किरकोळ दुखापत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!