हतनूरचे 36 दरवाजे दुसर्‍या दिवशीही उघडेच

0
भुसावळ । तालुक्यातील हतनुर धरणाच्या लाभ क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे दि.11 रोजी दुपारी 1 वाजता धरणाचे 36 दरवाजे उघड्यात आले ते दुसर्‍या दिवशी ही उघडेच होते. यामुळे तापी नदीला पुर आला असून येथील नगरपालिकेचा बंधाराही ओसंडन वाहत आहे.

हतनूरर धरणाच्या लाभ क्षेत्रातील तापी व पूर्णा नद्यांच्या परिसरात संततधार सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दि. 12 रोजी हतनुर धरणाचे संपूर्ण 36 दरवाजे दुसर्‍या दिवशीही उघडेच आहे. यात 10 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 24 दरवाजे 1 मीटर ने उघडे आहेत.

धरणाचा पाणी पातळी 209.260 मीटर, पाणीसाठ 174.80 दलघमी इतका असून धरणातून 3570.33 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यात कालव्यातून 11.33 तर तापी नदीत 3559 क्यू मेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीला पुर आला आहे. यामुळे भुसावळ पालिकेचा तापी नदी पात्रातील बंधारा ओसंडून वाहत आहे. यामुळे दि. 11 रोजी शहरात गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा झाला होता.

LEAVE A REPLY

*