Type to search

Featured आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव : भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या ‘हॉलिडे वर्क’ निसर्गचित्रांचे प्रदर्शन

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा उद्या 83 वा जन्मदिन. त्यानिमित्त जैन इरिगेशनमधील सहकारी, चित्रकार, शिल्पकार यांनी सुटीच्या दिवशी साकारलेली निसर्गचित्रांचे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वानखेडे गॅलरीमध्ये आयोजित केले आहे.

‘हॉलिडे वर्क’ या प्रदर्शनाचे उद्या दि.12 ला संध्याकाळी 5.30 वाजेला उद्घाटन करण्यात येणार आहे.

दि.12 ते 19 डिसेंबर भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. जलरंगातील व ॲक्रेलिक निर्सगचित्रांचे प्रशांत तिवारी यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते होणार आहे.

सुटीच्या दिवशी आपल्या अलौकिक कलेचा आनंद घेताना निसर्गचित्र प्रशांत तिवारी यांनी रेखाटली आहेत. यापैकी 46 निसर्गचित्रे जळगावकरांना प्रदर्शनात पाहता येणार असुन रसिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!