Type to search

maharashtra जळगाव

भडगाव तालुक्यात ‘दाहकता’ : पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न जटील

Share
सुनील पाटील
भडगाव । तालुक्यात टंचाईने डोके वर काढले असून चार गावांना पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सहा खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. मे महिन्यात टंचाईचे ढग अधिक गडद झाले असून या बिकट परिस्थितीत गिरणा धरणात पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न अधिक जटील बनला आहे.

भडगाव तालुक्यात कधी नव्हे, मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिंपरखेडसारख्या मोठ्या गावाला सध्यस्थितीला तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय नेहमी टंचाईने ग्रासलेल्या मळगाव, तांदुळवाडीची याहून वेगळी परिस्थिती नाही.

तालुक्यात चार गावांना पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. त्यात पिंपरखेडला दोन टँकर, मळगाव, तांदुळवाडी व वडगाव बु.॥ला प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय सहा ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. गिरणा काठ वगळता इतर गावांना मे महिन्यात ही स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

‘गिरणा’पट्ट्याला आवर्तनचा दिलासा
दुष्काळाच्या या संकटात टंचाई ढग गडद असतांना गिरणा धरणात पिण्यासाठी जून महिन्यापर्यंत पाणी पुरेल येवढे पाणी असल्याची समाधानाची बाब आहे. 9 तारखेला आवर्तन सोडण्यात आले आहेत. अजून एक आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्याला दिलासा मिळणार आहे. आवर्तन दोन महिन्याच्या अंतराने आवर्तन सोडण्यात येत आहे. आवर्तन सोडल्यानंतर जेमतेम एक महिना टंचाईचे संकट दूर होते. मात्र त्यानंतर एक महिना गिरणा काठाला पुन्हा टंचाईचा सामना करावा लागतो.

शेतीबाडीची परिस्थिती बिकट
गतवर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. पर्यायाने विहिरीची पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे रब्बी हंगाम पुरता कोलमडला आहे. रब्बीने फुललेले शिवार ओस पडले आहे. शेतकर्‍यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. खरिपासाठी पेरणी करण्यासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा? असा प्रश्न शेतकर्‍यासमोर उभा राहिला आहे.

जनावरांना चारा नाही!
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर आहे. त्यात जनावरांची पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. तालुक्यात 31 पाझर तलाव आहेत. त्यात खडखडाट आहे. तर विहिरींनी कधीचाच तळ गाठल्याने जनावरांना पाणी कुठून आणायचे? हा प्रश्न पशुपालकांसमोर आहे. चार्‍यांच्या दराने विक्रमी उचल मारली आहे. ज्वारीचा चारा चार हजारावर पोहोचला आहे. बाज

लोकप्रतिनिधीची पाठ!
एकीकडे तालुक्यातला शेतकरी दुष्काळाने होरपळत असतांना लोकप्रतिनिधीनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. आचारसंहितेच्या नावाखाली अधिकारी ही फारसे गाभिंर्याने घ्यायला तयार नाही. दुष्काळात आढावा बैठका घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!