Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

भडगावात नऊ वर्षीय बालकाचा खून?

Share
भडगाव । टोणगाव परिसरातील बांगडी व्यावसायिकाच्या गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. या मुलाचा खून झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचोरा रस्त्यावरील र.ना.देशमुख महाविद्यालयाच्या मागील केळीच्या शेतात त्याचा मृतदेह दुपारी 4 वाजेच्या सुमारास आढळून आला.

बब्बु सैय्यद रा.फतेहपुर (उत्तरप्रदेश) ह.मु.टोणगाव हे बांगडी बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा इशम बब्बु सय्यद (वय 9) दि.21 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो मिळून आला नाही. गुरूवारी रात्री भडगाव पोलिस स्टेशनला इशमचा अपरहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी ही त्याचा शोध सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही.

मात्र दि.22 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याचा मृतदेह पाचोरा रस्त्यावरील र. ना. देशमुख महाविद्यालयाला लागुन असलेल्या डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या केळीच्या शेतात मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलीस प्रशांत बच्छाव, डीवायएसपी नजीर शेख यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. दरम्यान घटनास्थळी एक रक्ताचे डाग असलेले टोकदार लाकुड आढळून आला आहे. त्याच्यानेच त्याचा खुन करण्यात असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे पाठविण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!