Type to search

जळगाव

मुलीच्या लग्नाचा बस्ता आगीत खाक

Share

भडगाव । तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र परदेशी यांच्या घराला शनिवारी आग लागली.या आगीत मुलीच्या लग्नाचा बस्त्यासह कांदा, सोने, रोख पैसे असे एकूण सात लाखांचे नुकसान झाले.

वाडे ( ता. भडगाव) येथील राजेंद्र परदेशी यांच्या वाडे कजगाव रस्त्याच्या शेतातील घराला शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मुलीचा लग्नाचा बस्ता, सोन्याचे दागीने, रोख दिड लाख रूपये, 90 क्विंटल कांदा, तीन पोते धान्य, सहा कापूस बियाण्याच्या थैल्या जळून खाक झाल्या. आगीत एकूण सात लाखाच्या जवळपास नुकसान झाले. आगी लागल्यानंतर परिसरात असलेल्या शेतकर्‍यांनी मदतीसाठी धाव घेतली. या आगीत परदेशी कुटुबियांचा सारा संसार जळून खाक झाला. तलाठी बी.डी.मंडळे यांनी सुमारे 7 लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी पोलीस पाटील भुषण पाटील, कोतवाल आबा मोरे, यांचेसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

लग्न कसे करायचे?
राजेंद्र परदेशी यांची मुलगी वर्षा हिचे 15 जून रोजी लग्न आहे. त्यामुळे आई वडिलांनी लग्नाचा बस्ता, सोने, नातेवाईकाकडून रोख पैसे आणले होते. सकाळी आई, वडील व मुलगी कामानिमित्त गावात गेलेले होते. शेतात मुलगा व मुलगी घराबाहेर शेताचे काम करीत होते. त्यावेळी घराला आग लागली. मुलांनी घराकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत सारा संसार जळून खाक झाला. त्यामुळे मुलीचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!