Friday, April 26, 2024
Homeजळगावपोलिसाची आत्महत्या; तरुणीला घेतले ताब्यात

पोलिसाची आत्महत्या; तरुणीला घेतले ताब्यात

जळगाव – 

पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी बीड येथे घडली आहे. याप्रकरणात सुसाइड नोटच्या आधारावरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगावातील तरुणीला अटक करण्यात येवून तिला तपासकामी बीड येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -

जळगाव  येथे सेवा बजावल्यानंतर तीन महिन्यापूर्वी  कॉन्स्टेबल दिलीप प्रकाश केंद्रे (वय 34, रा. केंद्रेवाडी धावडी, ता. अंबेजोगाई) यांची बदली बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकात झाल्याने तेथे ते रुजू झाले. मंगळवारी दिलीप केंद्रे पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर ते दुपारी कामानिमित्त बाहेर गेले. ते स्वामी समर्थनगरातील कपाशीच्या शेतात गेले. त्यांनी साध्या वेशात स्वत:च्या रिव्हालव्हरने कानशिलाजवळ गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आले.

त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात जळगावातील एक 33 वर्षीय तरुणी आणि तिच्या जळगावातील पोलीस प्रियकराच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्या तरुणीच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून कॉन्स्टेबल दिलीप केंद्रे यांनी पिस्तूलाने डोक्याला गोळी झाडून आत्महत्या केली. केंद्रे यांच्या पत्नी अनिता यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पूजा गुलाब पाटील हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड पोलीस जळगावात दाखल 

बीड येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड येथील कॉन्स्टेबल कैलास ठोके, नाईक तुकाराम तांबारे, विजय घोडके, महिला पोलीस कर्मचारी सौदरमल विद्या आणि वैशाली इंचके जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र पाटील, संतोष गिते, उज्ज्वला पाटील यांच्या सहकार्याने पिंप्राळा हुडको येथे जावून संशयित आरोपी तरुणीला अटक केली आहे.  दरम्यान, या प्रकरणात प्रेमाचा त्रिकोण झाल्याने हा अनर्थ झाल्याची माहिती समोर येत आहे. ब्लकमेलिंगमुळे दिलीप केंद्रे हे बदनामीला घाबरुन सतत तणावात राहत होते, असे  सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या