जळगाव कृउबासच्या जागेची नियमबाह्य विक्री

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोट्यावधी रूपये किमतीच्या जागांची नियमबाह्य विक्री झाल्याची तक्रार अप्पर आयुक्तांकडे करण्यात आली असुन यासंदर्भात अप्पर आयुक्त सुनिल पवार यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता उल्हास साबळे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती देतांना उल्हास साबळे यांनी सांगितले की, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा शहरातील काही व्यावसायिकांना देण्याचा ठराव तत्कालीन अध्यक्षांनी केला.

या जमिनीचे खरेदीखत संशयास्पद असुन त्यावर ‘दि अ‍ॅग्रो प्रॉडक्टस मार्केट कमिटी जळगाव’ असा उल्लेख असल्याचे साबळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, बाजार समितीला आपल्या मालकिच्या जागा परस्पर विक्री करण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच प्रकरणात मुंबई येथील संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.

भ्रष्टाचार करण्याच्यादृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारही बाजुने अनावश्यक दुकाने बांधुन येथे येणार्‍या शेतकर्‍यांची कोंडी करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

ही जागा शेतकर्‍यांची राहीली नसुन ती आता भांडवलदारांच्या ताब्यात गेली असल्याने याबाबत सहकारी संस्थांचे अप्पर आयुक्त सुनिल पवार यांच्याकडे दि. 6 डिसेंबर 2016 रोजी तक्रार करण्यात आली असुन त्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे साबळे यांनी सांगितले.

आज सुनावणी
या प्रकरणासंदर्भात उद्या दि. 4 ऑगस्ट रोजी दु. 3 वा. सहकारी संस्थांचे उपनिबंधक यांच्याकडे सुनावणी असल्याचेही उल्हास साबळे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*