Type to search

बर्‍हाणपूर येथे बस अपघातात चौघांचा मृत्यू; 20 जण जखमी

maharashtra जळगाव

बर्‍हाणपूर येथे बस अपघातात चौघांचा मृत्यू; 20 जण जखमी

Share
बर्‍हाणपूर । इंदुर-इच्छापूर हायवेजवळील झांझर डेम परिसरात बर्‍हाणपुरहून खंडव्याकडे जाणार्‍या आयशर ट्रकने धडक दिल्याने बसच्या साईटचा पत्रा कापून बसचालकासह चार जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याची घटना दि.17 रोजी दुपारी 2.30 वाजता घडली. दरम्यान आयशर ट्रकचालक ट्रक घेवून पसार झाला आहे.

खंडव्याकडे घेवून जाणारी बस क्र.(एम.पी.12, पी.6064) ही बस प्रवासी घेऊन जात असतांना बर्‍हाणपूरकडून खंडव्याकडे जाणार्‍या आयशर ट्रकने धडक दिल्याने बसच्या खिडकीजवळचा एका बाजुचा पत्रा कापल्या गेल्याने बसचालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहे. आयशर ट्रकचालक हा ट्रक घेवून पसार झाला आहे. ही बस विना परमीट असल्याचे समजते.

अपघात झाल्यानतर वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी निंबोला पोलीस स्टेशनचे पालीस अधिकारी दाखल झाले होते. रस्त्यावर अक्षरश: रक्ताचे थारोळे पडले होते. ट्रकचालक हा पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. जखमीना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!