Type to search

Breaking News जळगाव

एनओसी मिळण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Share

जळगाव – 

नवीन कर्ज घेण्यासाठी बँकेने एनओसी द्यावी, म्हणून दारुच्या नशेत गोंधळ घालीत अंगावर रॉकेल ओतून कर्जदाराने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दाणा बाजारातील पीपल्स बँकेच्या मुख्य शाखेत मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .

या प्रकरणी कर्जदार यशवंत लक्ष्मण खडके ( वय 49) रा. बांभोरी याचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांभोरी येथील रहिवासी यशवंत खडके याचे नावे जळगाव पीपल्स बँकेत कर्ज आहे. असे असताना देखील तो बँकेत येऊन नवीन कर्ज घेण्यासाठी अर्ज न देता एनोसी मागत होता . त्याने सन 2002 मध्ये घरगुती वापराचे कारण दाखवून कर्ज घेतले असून त्याच्यावर मंगळवार पर्यंत 57 हजार 672 रुपये थकबाकी नावे दिसत होते.

दरम्यान बँकेने त्यांना 10 हजार रुपये भरण्याच्या सूचना केल्यानंतर खडके यांनी 10 हजार रुपये देखील बुधवारी बँकेत भरले. दरम्यान अट व शर्थीची एनओसी देण्यास विलंब होत असतानाच त्याने स्वतः बरोबर आणलेली पेट्रोल ची बाटली अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला .

दरम्यान हि बाब बँकेच्या कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्याला अडवून शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला. लागलीच शर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून खडके यांना ताब्यात घेण्यात आले.

काही वेळानंतर पीपल्स बँकेच्या अधिकार्‍यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन अट व शर्थीची एनओसी खडके यांना दिली.  मात्र,ती कंडिशनल एनओसी घेण्यास खडके यांनी नकार दिला.

दिवसभर खडके यांना शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्यानंतर त्यांचे विरुद्ध बँकेचे वसुली अधिकारी हेमंत प्रकाशचंद्र भट यांनी दिलेल्या फिर्यादिवरून शहर पोलीस ठाण्यात कलम 309, 510 प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी खडके याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक रवींद्र सोनार करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!