Type to search

Breaking News जळगाव

बी.जे.मार्केट गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

Share

जळगाव  – 

न्याय न मिळाल्यास व आमचे म्हणणे मंजूर न झाल्यास आम्ही बी.जे.मार्केटसह 14 मार्केटमधील गाळेधारक आंदोलनाचा पवित्रा घेवू, अशी माहिती 14 मार्केट गाळेधारक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शांतारामदादा सोनवणे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, बी.जे.मार्केटसह 14 मार्केटमधील गाळेधारकांनी नुकतीच आमदारांकडे ठिय्या मांडून आपली कैफियत मांडली होती.

या गाळेधारकांमधील गाळेधारकांची परिस्थिती एवढे बिल भरण्यासारखी नाही, बहुतेक गाळेधारक अत्यंत गरीब आहेत, मात्र मनपाकडून कारवाईबाबत हेकेखोपणा सुरू आहे. तसेच  आमदारांकडूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने गाळेधारकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.

यानंतरही समाधानकारक तोडगा न निघाल्यास अथवा मनपाकडून काही कारवाई सुरू झाल्यास 27 रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सर्व गाळेधारकांच्या वतीने गाळेधारक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शांतारामदादा सोनवणे यांनी दिला.

यावेळी बैठकीत अध्यक्ष शांतारामदादा सोनवणे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, विलास  सांगोरे, सुरेश पाटील, पंकज मोमाया, वसीम काझी, राजेश समदाणी, भागवत मिस्त्री, प्रकाश गगवाणी, राजाराम कटारीा, शंकर हासवाणी, गणेश शिंपी, योगेश भागवानी, रवी निकम, नंदू सोनार, गोपाल बजाज आदी उपस्थित होते.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!